व्हाटसअ‍ॅप युजर्ससाठी तीन स्पेशल फिचर्स

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरने आपल्या ग्रुप अ‍ॅडमीन्स तसेच अन्य युजर्ससाठी तीन स्वतंत्र फिचर्स अपडेटच्या स्वरूपात प्रदान केले असून आपण याची माहिती घेऊया.

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरवर अलीकडच्या काळात युजर्स तसेच ग्रुप अ‍ॅडमीनसाठी विविध महत्वाचे फिचर्स दिले जात आहेत. आपण जर कोणत्याही व्हाटसअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमीन असाल, अथवा कोणत्याही ग्रुपमधील सदस्य असाल तर हे फिचर्स आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.

१) मेन्शन : -फेसबुकवर आपण कुणाही युजरला ‘@’ या चिन्हाने मेन्शन करू शकतो. याचे संबंधीत युजर वा पेजच्या अ‍ॅडमीनला नोटिफिकेशन जात असते. याच पध्दतीने व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरवर आधीच ‘@’ या चिन्हाने कोणत्याही ग्रुपमधील सदस्याला मेन्शन करण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र हे फिचर फेसबुकप्रमाणे परिपूर्ण पध्दतीत काम करत नव्हते. आता मात्र या फिचरला अपडेट करण्यात आले आहे. यामुळे आता कुणीही युजर कोणत्याही ग्रुपमधील अन्य युजरला त्याच्या नावाच्या आधी ‘@’ हे चिन्ह लाऊन मेन्शन करू शकतो. तसेच त्याच्याशी या माध्यमातून संवाददेखील साधू शकतो.

३) ग्रुपचे विवरण : व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरने या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात ‘ग्रुप इन्फो’ हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत दिले होते. आता सर्व युजर्सला याचे अपडेट सादर करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत कोणत्याही व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये संबंधीत ग्रुपची माहिती देणारे विवरण देण्याची सुविधा देण्यात आली आहे. कुणीही युजर ग्रुप इन्फो या विभागात जाऊन संबंधीत ग्रुपचे विवरण टाईप करू शकतो. मात्र ग्रुप अ‍ॅडमीनचे यावर कंट्रोल असेल. अर्थात तो याला संपादीत करू शकतो अथवा याला कॅन्सलदेखील करू शकतो.

३) ग्रुप अ‍ॅडमीनला वाढीव अधिकार :- व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरने काही दिवसांपूर्वीच रेक्ट्रीक्ट ग्रुप हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत दिले होते. आता सर्व ग्रुप अ‍ॅडमीन्सला याचा वापर करता येणार आहे. याच्या मदतीने कोणत्याही व्हाटसअ‍ॅप ग्रुपमधील एखाद्या सदस्याला त्या ग्रुपमध्ये पोस्ट टाकण्याला मज्जाव करण्याची सुविधा ग्रुप अ‍ॅडमीनला मिळणार आहे. तसेच कोणत्याही व्हाटसअ‍ॅप ग्रुपमधील सदस्याला सर्च करणे सोपे झाले आहे. याच्या सोबतीला व्हाटसअ‍ॅपचा आयकॉन वा ग्रुपच्या विवरणाच्या माहितीवरदेखील ग्रुप अ‍ॅडमीनचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित होणार आहे.

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरच्या अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींच्या युजर्ससाठी वरील तिन्ही फिचर्स हे प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here