व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरवर स्टीकर्स वापरण्याची मिळणार सुविधा

0
व्हाटसअ‍ॅप स्टीकर्स, whatsapp stickers

व्हाटसअ‍ॅपचे युजर्स आता स्टीकर्स वापरू शकणार असून एका अपडेटच्या माध्यमातून हे फिचर वापरण्यासाठी मिळणार आहे.

व्हाटसअ‍ॅपवर स्टीकर्स येणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू आहे. गेल्या वर्षाच्या मध्यावर स्टीकर्स बाबत पहिल्यांदा माहिती समोर आली होती. यानंतर या वर्षाच्या जानेवारी महिन्यात अँड्रॉइडच्या बीटा आवृत्तीच्या युजर्ससाठी हे फिचर कार्यान्वित करण्यात आले होते. तेव्हा हार्टचे स्टीकर देण्यात आले होते. मात्र, यानंतर कोणतेही नवीन स्टीकर देण्यात आलेले नाही. अर्थात व्हाटसअ‍ॅपने स्टीकर्सचे फिचर हे स्थगित केल्याचे मानले जात होते. तथापि, आता अँड्रॉइड व आयओएस या प्रणालींच्या युजर्ससाठी फिचर्स वापरण्याची सुविधा देण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. व्हाटसअ‍ॅपच्या आगामी फिचर्सबाबत अतिशय अचूकपणे भाकिते करणार्‍या WABetaInfo या संकेतस्थळाने याबाबत माहिती दिली आहे.

या वृत्तानुसार व्हाटसअ‍ॅपने आपल्या अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या युजर्सने स्टीकर्स नेमके कसे वापरावेत याची माहिती एफएक्यू (फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्‍चन्स) या विभागात दिलेली आहे. यामुळे व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला स्टीकर्स वापरण्याची सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही युजर्सला याची सुविधा मिळाली असून इतरांसाठी क्रमाक्रमाने हे फिचर कार्यान्वित केले जाणार आहे. अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्ससाठी २.१८.३२९ तर आयओएस आवृत्तीसाठी २.१८.१०० या आवृत्तीला अपडेट केल्यानंतर स्टीकर्स वापरता येणार असल्याचे WABetaInfo ने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

व्हाटसअ‍ॅपचे युजर्स स्टीकर्स सहजपणे वापरू शकणार आहेत. युजरला वैयक्तीक अथवा ग्रुपमध्ये याचा वापर करण्यासाठी चॅट बॉक्सवर क्लिक करावे लागेल. यानंतर इमोजीसोबत स्टीकर्सचा पर्याय देण्यात येणार आहे. युजर विविध स्टीकर्सला डाऊनलोड करून याचा वापर करू शकतो. तर डाऊनलोड करण्यात आलेले स्टीकर्स हे एका स्वतंत्र विभागात सेव्ह होणार असून त्यांचा पुन्हा वापर करण्यासाठी नव्याने डाऊनलोड करण्याची आवश्यकता उरणार नाही. पहिल्या टप्प्यात विविध डेव्हलपर्सनी तयार केलेल्या स्टीकर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये कपी, सॉल्टी, कोमो, बीबीएमबॅप फ्रेंडस्, उंची अँड रॉली, शिबा उनी, द मालाड्रॉल्ट, कोको, फिअरलेस अँड फॅब्युलस, बनाना, बिस्कुट आणि हॅच आदी १२ स्टीकर्स देण्यात आलेले आहेत. हे सर्व स्टॅटीक (स्थिर) या प्रकारातील आहेत. मात्र लवकरच अ‍ॅनिमेटेड स्टीकर्सदेखील युजर्सला देण्यात येणार असल्याचा या वृत्तात नमूद करण्यात आलेले आहे. या सर्व स्टीकर्सचा वापर करण्यासाठी युजरने आपल्या अँड्रॉइड/आयओएस अ‍ॅपला अपडेट करण्याची आवश्यक असल्याची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here