व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरवर स्टीकर्स स्टोअर

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरने आपल्या विंडोज युजर्ससाठी स्टीकर्स स्टोअरसह अन्य फिचर दिले असून या प्रणालीच्या ताज्या बीटा आवृत्तीत याचा समावेश करण्यात आला आहे.

व्हाटसअ‍ॅपने विंडोज या प्रणालीसाठी २.१८.२४ ही ताजी बीटा आवृत्ती नुकतीच सादर केली आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यात स्टीकर्स स्टोअर देण्यात आले आहे. व्हाटसअ‍ॅपवर आधीच फेसबुकप्रमाणे स्टीकर्सची सुविधा देण्यात आलेली आहे. स्टीकर्स स्टोअरमध्ये विविध प्रकारच्या स्टीकर्सला एकाच ठिकाणी देण्यात आले असून याचा युजरला वापर करता येणार आहे. अद्याप हे फिचर अँड्रॉइड अथवा आयओएस प्रणालींसाठी देण्यात आलेली नाही हे विशेष. अर्थात विंडोज प्रणालीवर हे फिचर सर्वात पहिल्यांदा वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, यासोबत विंडोज प्रणालीच्या युजर्सला लाईव्ह लोकेशन शेअरिंगची सुविधा देण्यात आलेली आहे. हे फिचर आधीच अँड्रॉइड व आयओएस या प्रणालींसाठी देण्यात आलेले आहे. तर विंडोजच्या युजर्सला याचा वापर करता येणार आहे. हे फिचर अतिशय उपयुक्त असून याच्या माध्यमातून कोणताही युजर हा दुसर्‍याला आपले भौगालिक लोकेशन अगदी अचूकपणे शेअर करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here