व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये ‘मेन्शन’ केल्याचे नोटिफिकेशन मिळणार

0
whatsapp

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरच्या कोणत्याही ग्रुपमध्ये एखाद्याला अन्य युजरने ‘मेन्शन’ केल्यास याचे नोटिफिकेशन मिळणार आहे. लवकरच हे फिचर सर्व युजर्सला मिळू शकते.

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरच्या युजर्ससाठी आधीच ‘@’ या चिन्हाने ग्रुपमधील अन्य सदस्याला ‘मेन्शन’ करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यातून ग्रुपमधील अन्य सदस्यांना संबंधीत ‘मेन्शन’ची माहिती मिळत होती. आता मात्र व्हाटसअ‍ॅप या फिचरचा विस्तार करणार असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात @WABetaInfo या ट्विटर अकाऊंटने ताजी माहिती दिली आहे. यानुसार एखाद्या युजरला अन्य युजरने कोणत्याही ग्रुपमध्ये ‘@’ या चिन्हाने मेन्शन केल्यास याची समोरील युजरला नोटिफिकेशनच्या स्वरूपात माहिती मिळेल. या नोटिफिकेशनवर क्लिक केल्यावर थेट त्या ‘मेन्शन’च्या ठिकाणी युजर जाऊ शकतो. एखाद्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. सध्या तरी हे फिचर प्रायोगिक अवस्थेत असून लवकरच ते सर्व युजर्सला मिळू शकते.

फेसबुकवर टॅग अथवा मेन्शन केल्यावर नोटिफिकेशन मिळण्याची सुविधा आधी देण्यात आली आहे. व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरच्या या आगामी फिचरच्या माध्यमातून हीच सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here