व्हाटसअ‍ॅपवर स्वत:चे स्टीकर असे करा तयार !

0

व्हाटसअ‍ॅपवर कुणीही आपल्याला हव्या त्या प्रतिमेचे स्टीकर अगदी सहजपणे तयार करू शकणार असून याची अगदी सुलभ-सोप्या शब्दातील ही माहिती आपल्याला सादर करत आहोत.

व्हाटसअ‍ॅपवर सादर करण्यात आलेल्या स्टीकर्स फिचरने युजर्सला अक्षरश: वेड लावले आहे. काही दिवसांमध्येच याला तुफान लोकप्रियता लाभली आहे. अगदी इमोजीपेक्षा याला जास्त पसंती मिळत आहे. कारण प्रतिमा, स्केचेस, ग्राफीक्स आदींना स्टीकर्सच्या स्वरूपात शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. व्हाटसअ‍ॅपवर शेअर करण्यासाठी अनेक स्टीकर्स आधीच उपलब्ध आहेत. मात्र सर्वात लक्षणीय बाब म्हणजे कुणीही आपल्याला हवे ते स्टीकर तयार करून शेअर करू शकणार आहे. यासाठी व्हाटसअ‍ॅपने गाईडलाईनदेखील जाहीर केली आहे. यासाठी कोडींगच्या तांत्रिक कौशल्याची आवश्यकता आहे. तथापि, काही थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्सच्या मदतीने कुणीही आपल्याला हवे असणारे स्टीकर अगदी सुलभ पध्दतीत तयार करून ते शेअर करू शकतो. यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपले व्हाटसअ‍ॅप अ‍ॅप हे अपडेट असल्याची खातरजमा करावी लागेल. यानंतर गुगल प्ले स्टोअरवर या लिंकवर जाऊन ‘Sticker maker for WhatsApp’ हे अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल. एकदा का हे अ‍ॅप इन्स्टॉल झाले की, खालीलप्रमाणे स्टेप्स पार पाडाव्या लागतील.

स्टेप १) ‘व्हाटसअ‍ॅप स्टीकर मेकर’ हे अ‍ॅप उघडल्यानंतर क्रियेट न्यू स्टीकरपॅक या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर संबंधीत स्टीकरपॅकचे नाव आणि ऑथरचे नाव भरून ‘क्रियेट’ या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप २) यानंतर आपल्यासमोर मोकळ्या स्क्रीनवर ‘ट्राय आयकॉन’ हा पर्याय येईल. याच्या अंतर्गत आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये आधीच सेव्ह केलेली एखादी इमेज, इमोजी आदी वापरू शकतो. याशिवाय आपण कोणताही फोटो वापरू शकतो. अगदी कॅमेर्‍यात काढलेल्या फोटोचाही यात वापर करता येणार आहे. (या स्टेप १ आणि २ बाबत खाली दिलेल्या प्रतिमेनुसार दिसतील.)

स्टेप ३) तिसर्‍या टप्प्यात आपल्याला स्टीकरमध्ये परिवर्तीत करण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिमा सिलेक्ट करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.

स्टेप-४) यानंतर आवश्यक त्या परमीशन्स मागितल्या जातील. आपण याला मंजूर केल्यानंतर संबंधीत प्रतिमा आपल्याला स्क्रीनवर दिसेल. येथे आपण स्टीकर तयार करण्याआधी त्या प्रतिमेला एडिट करू शकतो. यात झूम इन-आऊट तसेच क्रॉप करण्याची सुविधा दिलेली आहे. हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर ‘येस सेव्ह स्टीकर’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप-५) यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये संबंधीत स्टीकर हे ‘पब्लीश’ करण्याच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपले स्टीकर हे वापरण्यासाठी तयार होते. हे स्टीकर आपण वैयक्तीक चॅटींग अथवा कोणत्याही ग्रुपमध्ये वापरू शकतातात. (खालील प्रतिमेत स्टेप-३ ते स्टेप-५ पर्यंतचे स्क्रीनशॉट दशर्र्विण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here