व्हाटसअ‍ॅपवर आता पिक्चर-इन-पिक्चर मोड

0
व्हाटसअ‍ॅप पिक्चर-इन-पिक्चर मोड, whatsapp picture in picture mode

व्हाटसअ‍ॅपवर आता युजर्ससाठी पिक्चर-इन-पिक्चर हे नवीन फिचर अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे.

व्हाटसअ‍ॅपवर पिक्चर-इन-पिक्चर मोड येणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. याची काही निवडक डेव्हलपर्सच्या माध्यमातून चाचणीदेखील घेण्यात आली होती. आता अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्ससाठी हे फिचर अपडेटच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आजपासून याला प्रारंभ झाला असून येत्या काही दिवसांमध्ये जगभरातील युजर्सला हे फिचर वापरता येणार असल्याची माहिती व्हाटसअ‍ॅपच्या आगामी फिचर्सबाबत अतिशय अचूकपणे भाकिते करणार्‍या WabetaInfo या संकेतस्थळाने दिली आहे.

व्हाटसअ‍ॅपने अँड्रॉइड प्रणालीसाठी असणारी २.१८.३०१ ही बीटा आवृत्ती आज सादर केली आहे. यामुळे आता व्हाटसअ‍ॅपचा ग्रुप अथवा वैयक्तीच चॅटवर शेअर करण्यात आलेले युट्युब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अथवा अन्य सोशल संकेतस्थळांवरील व्हिडीओज हे अन्य ठिकाणी रिडायरेक्ट न होता व्हाटसअ‍ॅपमध्येच पाहता येतील. यातील प्ले या पर्यायावर क्लिक केल्यावर संबंधीत व्हिडीओ हा पिक्चर-इन-पिक्चर या प्रकारात पहावयाचा आहे का? याची विचारणा करण्यात येईल. याला युजरने होकार दिल्यास हा मोड सुरू होतो. या माध्यमातून कोणत्याही ग्रुप अथवा वैयक्तीक चॅटींगदरम्यान व्हिडीओ पाहता येतो. म्हणजे हा व्हिडीओ सुरू असतांना युजर संबंधीत ग्रुप अथवा वैयक्तीच चॅटींग करू शकतो. मात्र याला बदलल्यास ही विंडोज गायब होते ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच स्ट्रीमेबल या संकेतस्थळावरील व्हिडीओदेखील याच प्रकारात पाहता येणार आहेत. हे फिचर वापरण्यासाठी आपल्या अँड्रॉइडच्या बीटा प्रोग्रॅमसाठी साईन-अप केलेले असणे आवश्यक आहे. तसेच युजरने आपले व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरची ताजी आवृत्ती अपडेट करणेही गरजेचे आहे.

पिक्चर-इन-पिक्चर हे आधी आयओएस प्रणालीसाठी देण्यात आले होते. आता अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्सलाही याचा वापर करता येणार आहे. सध्या याला बीटा आवृत्तीत सादर करण्यात आले असले तरी येत्या काही दिवसांमध्ये सर्व युजर्सला हे फिचर वापरता येणार आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here