व्हाटसअ‍ॅपवर आकर्षक फिल्टर्स

0

व्हाटसअ‍ॅपने आता आपल्या युजर्सला आकर्षक फिल्टर्सच्या माध्यमातून प्रतिमांना सुशोभित करून शेअर करण्याची सुविधा प्रदान केली असून ती पहिल्यांदा बीटा आवृत्ती वापरणार्‍यांना मिळणार आहे.

व्हाटसअ‍ॅपने आपल्या आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी २.१७.९७ हे नवीन अपडेट सादर केले आहे. यामध्ये फिल्टरची सुविधाही देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत व्हाटसअ‍ॅपच्या कॅमेर्‍यात प्रतिमा, व्हिडीओ अथवा जीआयएफ अ‍ॅनिमेशनच्या वर आकर्षक फिल्टर लाऊन ते शेअर करू शकतात. सध्या पॉप, ब्लॅक अँड व्हाईट, कुल, क्रोम आणि फिल्म या पाच प्रकारचे फिल्टर्स उपलब्ध करण्यात आले आहेत. याचा वापर करून सुशोभित करण्यात आलेल्या प्रतिमा वैयक्तीक चॅट अथवा ग्रुपमध्ये शेअर करता येतील. याशिवाय व्हिडीओ आणि जीआयएफ अ‍ॅनिमेशन्सवरही हे फिल्टर्स वापरता येणार आहेत हे विशेष. यासोबत या ताज्या अपडेटमध्ये रिप्लाय शॉर्ट कट प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने मॅसेजच्या उजव्या बाजूला स्वाईप करून कुणीही तात्काळ उत्तर देऊ शकणार आहे. आधी फिल्टरची सुविधा आयओएस प्रणालीच्या युजर्सला देण्यात आल्या असून आता व्हाटसअ‍ॅपची बीटा आवृत्ती वापरणार्‍या अँड्रॉइड युजर्सलाही हे फिल्टर्स वापरता येणार आहेत. तर व्हाटसअ‍ॅपवर लवकरच युपीआय या प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीमदेखील लाँच करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here