व्हाटसअ‍ॅपवरून डीलीट झालेल्या फाईल्सही डाऊनलोड करता येणार

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आता आपल्या युजर्ससाठी त्यांनी डीलीट केलेल्या फाईल्स पुन्हा डाऊनलोड करण्याची सुविधा प्रदान केली आहे.

व्हाटसअ‍ॅपवरून आपण अनेकदा प्रतिमा, व्हिडीओ, ऑडिओ, जीआयएफ अ‍ॅनिमेशन, डॉक्युमेंट आदी मीडिया फाईल्स डीलीट करत असतो. मात्र काही दिवसांनी आपल्याला यापैकी एखादी मीडिया फाईल हवी असल्यास अडचण येत असते. नेमकी हीच बाब लक्षात घेत आता व्हाटसअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक अत्यंत अभिनव असे फिचर प्रदान केले आहे. व्हाटसअ‍ॅपने कोणताही गाजावाजा न करता अँड्रॉइड प्रणालीसाठी असणार्‍या २:१८:११० या प्रयोगात्मक अवस्थेतल्या (बीटा आवृत्ती) आवृत्तीसाठी ही सुविधा प्रदान केली आहे. व्हाटसअ‍ॅपच्या बीटा आवृत्तीबाबत अतिशय अचूकपणे माहिती देणार्‍या ‘wabetainfo’ या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. सध्या हे फिचर फक्त प्रायोगिक अवस्थेत असून फक्त अँड्रॉइड प्रणालीसाठी देण्यात आले आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये सर्व युजर्ससाठी याला कार्यान्वित करण्यात येईल असे संकेत आता मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here