व्हाटसअ‍ॅपवरून अशा प्रकारे मिळवा रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती

0
व्हाटसअ‍ॅपवरून रेल्वे गाड्यांसह आरक्षणाची अचूक माहिती,whatsapp train status

व्हाटसअ‍ॅपवरून आता देशभरातील कोणत्याही रेल्वे गाडीसह आरक्षणाची अचूक माहिती मिळणार असून आयआरसीटीसीने हे फिचर कार्यान्वित केले आहे.

आयआरसीटीसीने नुकताच ‘मेक माय ट्रिप’ या कंपनीशी सहकार्याचा करार केला आहे. याच्या अंतर्गत विविध सेवांमध्ये रेल्वे प्रशासन आणि ही कंपनी एकत्रीतपणे काम करणार आहे. या अनुषंगाने आता एका स्वतंत्र मोबाईल क्रमांकाचा वापर करून रेल्वे गाड्यांची धावण्याची स्थिती तसेच रिझर्व्हेशनची अचूक माहिती देणारी प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या क्रमांकावर कुणीही आपल्याला माहिती हव्या असणार्‍या रेल्वे गाडीचा क्रमांकाचा मॅसेज करावयाचा आहे. यानंतर लागलीच त्या युजरला संबंधीत गाडीच्या ‘स्टेटस’ची माहिती मिळणार आहे.

व्हाटसअ‍ॅपवरून रेल्वे गाड्यांच्या स्टेटसची माहिती मिळवण्याची पध्दत अगदी सुलभ आहे. यासाठी युजरला खाली प्रक्रिया पार पाडाव्या लागतील.

* आपल्या स्मार्टफोनमध्ये ७३४९३८९१०४ हा क्रमांक सेव्ह करा. हा क्रमांक ‘मेक माय ट्रिप’ कंपनीच्या व्हाटसअ‍ॅप बिझनेस अकाऊंटला संलग्न आहे.

* या क्रमांकावर आपल्याला हव्या असणार्‍या ट्रेनचा क्रमांक टाकावा. यानंतर लागलीच त्या ट्रेनच्या ‘स्टेटस’ची माहिती त्या युजरला व्हाटसअ‍ॅप मॅसेजच्या माध्यमातून मिळते.

* साधारणपणे ही प्रक्रिया अतिशय जलद गतीने होते. तथापि, काही वेळेस यासाठी विलंब लागू शकतो. येथे एक बाब लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की, आपण पाठविलेल्या ट्रेनचा क्रमांक रीड झाल्यावरच म्हणजेच दोन ब्ल्यू टिकची ‘रीड रिसिप्ट’ मिळाल्यावरच ही माहिती मिळणार असल्याचे ‘मेक माय ट्रिप’ने नमूद केले आहे.

* या प्रक्रियेच्या माध्यमातून ट्रेनची लाईव्ह स्थिती कळणार आहे. यात त्या ट्रेनने कोणते रेल्वे स्थानक पार केले आहे? कोणते स्थानक येणार आहे ? ती ट्रेन वेळेवर की विलंबाने (उशीरा धावत असल्यास नेमका किती वेळ) धावत आहे? याची माहिती मिळू शकणार आहे.

* सर्वात महत्वाची बाब म्हणजे या क्रमांकावर कुणीही पीएनआर क्रमांक टाकल्यास त्याचे प्रेझेंट स्टेटसदेखील कळू कणार आहे.

टिप : काही स्मार्टफोनधारकांसाठी ही सेवा तात्काळ कार्य करत असली तरी काहींना मात्र विलंब लागत असल्याची बाब आपण येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांमध्ये सर्व युजर्ससाठी याला गतीमान अवस्थेत कार्यान्वित करण्यात येईल ही अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here