व्हाटसअ‍ॅपच्या पेमेंट प्रणालीची नांदी

0

व्हाटसअ‍ॅपवर लवकरच पेमेंट सिस्टीम देण्यात येणार असून या मॅसेंजरच्या बीटा आवृत्तीमध्ये याचे संकेत दिसून येत आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून व्हाटसअ‍ॅपवर पेमेंट प्रणाली येणार असल्याची चर्चा सुरू करण्यात आली होती. यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण व्हाटसअ‍ॅपच्या ताज्या बीटा आवृत्तीमध्ये याची थोडी छलक दिसून येत आहे. यामध्ये भारत सरकारच्या युपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) प्रणालीवर आधारित देवाण-घेवाण करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदा अँड्रॉइड या प्रणालीवर ही सिस्टीम येऊ शकते. यासाठी डॉक्युमेंट, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट यांच्यासोबत ‘पेमेंट’ या नावाने नवीन पर्याय देण्यात येणार आहे. यावर क्लिक केल्यावर संबंधीत युजरच्या ‘युपीआय’ अकाऊंट उघडते. कुणाचे युपीआयवर अकाऊंट नसल्यास त्याला याबाबत सूचित करण्यात येते. एका का युपीआयचे अकाऊंट संलग्न केले की, कुणीही यावरून पैशांची देवाण-घेवाण करू शकतो. काही बीटा युजर्सला याचा वापरदेखील करता येत आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये ही प्रणाली सर्व युजर्सला मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here