व्हर्लपूलच्या एयर कंडिशनरची नवीन मालिका

0

व्हर्लपूल कंपनीने भारतात एयर कंडिशनर्सची मालिका सादर केली असून यात वाय-फाय नेटवर्कचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ४३ ते ५९ हजारांच्या दरम्यान आहेत.

व्हर्लपूल कंपनीने आपल्या एयर कंडिशनर्सच्या नवीन मालिकेत वाय-फाय कनेक्टीव्हिटी दिली आहे. या मालिकेत १ आणि १.५ टन क्षमतांचे मॉडेल्स लाँच करण्यात आले असून या सर्वांमध्ये ही सुविधा आहे. यासाठी व्हर्लपूलने खास स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन विकसित केले असून ते अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले आहे. एयर कंडिशनर असणार्या भागात असलेल्या वाय-फाय नेटवर्कवरून या अ‍ॅपच्या मदतीने स्मार्टफोनवरून नियंत्रण करता येते. अर्थात स्मार्टफोन हाच यासाठी रिमोट कंट्रोलचे काम करतो. या माध्यमातून संबंधीत व्यक्ती कुठेही असतांना आपल्या एयर कंडिशनरला चालू-बंद करण्यासह याच्या विविध सेटींगमध्ये बदल करू शकतो. तसेच या अ‍ॅपवर संबंधीत एयर कंडिशनर नेमक्या किती विजेचा वापर करतेय? याची अचूक माहितीदेखील मिळू शकते.

व्हर्लपूलचे हे नवीन एयर कंडिशनर्स इन्व्हर्टर या प्रणालीवर आधारित असून यामुळे यात विजेची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये ‘थ्रीडी कुल’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये तीन व्हेंट देण्यात आले असून ते या मॉडेलच्या परिसरातील गरम हवा ही ४० टक्के अधिक वेगाने बाहेर फेकण्यास सक्षम आहेत.अगदी ५५ अंश सेल्सियसच्या तापमानातील परिसरालाही वेगाने थंड करण्याची क्षमता या मॉडेल्समध्ये असण्याचा दावा कंपनीने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here