व्हर्च्युअल असिस्टंटसुक्त पॅनासोनिकचे दोन स्मार्टफोन

0

पॅनासोनिक कंपनीने एल्युगा ए ३ आणि ए ३ प्रो हे दोन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केले असून यात अर्बो हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे.

कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजियन्सवर आधारित व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट आता प्रचंड वेगाने प्रचलीत होऊ लागले आहेत. अ‍ॅपलचा सिरी, अमेझॉनचा अलेक्झा, गुगलला गुगल असिस्टंट, मायक्रोसॉफ्टचा कोर्टाना आणि सॅमसंगचा बिक्सबी हे अस्टिंट विविध स्मार्टफोन्समध्ये देण्यात येत आहेत. अर्थात बहुतांश असिस्टंट हे महागड्या मॉडेल्समध्ये इनबिल्ट स्वरूपात देण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, पॅनासोनिक कंपनीने अर्बो हा आपण स्वत: विकसित केलेला व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट आपल्या एल्युगा ए ३ आणि ए ३ प्रो या दोन मॉडेल्समध्ये प्रदान केला आहे. याचा उपयोग करून कुणीही युजर व्हाईस कमांडच्या मदतीने विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो.

उर्वरित फिचर्सचा विचार करता, पॅनासोनिक एल्युगा ए ३ आणि एल्युगा ए ३ प्रो या दोन्ही मॉडेलमध्ये फक्त प्रोसेसर आणि स्टोअरेज भिन्न आहेत. एल्युगा ए ३ या मॉडेलमध्ये क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसर असून ए ३ प्रो या मॉडेलमध्ये ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक एमटी६७५३ हा प्रोसेसर आहे. तर पॅनासोनिक एल्युगा ए ३ मध्ये इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी तर ए३ प्रो या मॉडेलचे स्टोअरेज ३२ जीबी इतके असेल. दोन्ही मॉडेल्सची रॅम तीन जीबी आहे. या दोन्ही मॉडेलमध्ये १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असेल. दोन्ही मॉडेल्समध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी २.०, फिंगरप्रिंट स्कॅनर, ओटीजी, ड्युअल सीम आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here