वीज पडण्याची सूचना देणारे अ‍ॅप

0

दरवर्षी वीज पडून मृत्यू होणार्‍यांची संख्या चिंताजनक पध्दतीने वाढत असतांना आता नेमकी कोणत्या भागात वीज पडेल? याची तब्बल ४५ मिनिटे आधी पूर्वसूचना देणारे अ‍ॅप आता विकसित करण्यात आले आहे.

जगभरात दरवर्षी वीज पडून मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्त हानी होत असते. वीजांपासून बजाव करण्याच्या काही प्राथमिक बाबी आपणा सर्वांना माहिती आहे. तथापि, वीज केव्हा पडेल (यासोबत वादळाची सूचनाही यातून मिळते.) याची सर्वसामान्यांना अचूक माहिती देणारी प्रणाली अद्याप प्रचलीत झालेली नाही. या पार्श्‍वभूमिवर, कर्नाटक सरकारचे महसूल खाते आणि आपत्कालीन विभागाने अमेरिकेतील अर्थ नेटवर्क या कंपनीच्या मदतीने सिदीलू या नावाने अ‍ॅप तयार केले आहे. यात लोकेशनवर आधारित वीजांचे लाईव्ह स्टेटस् देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सिदीलू अ‍ॅप हे अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी मोफत सादर करण्यात आले आहे. हे अ‍ॅप वापरणार्‍याला कोणत्याही भागात वीज पडण्याआधी याची ४५ मिनिटांआधी पूर्वसूचना मिळणार आहे. यामध्ये लाल रंगाचा अलर्ट आल्यास संबंधीत युजर असणार्‍या एक किलोमीटर परिघाच्या परिसरात वीज कोसळू शकते. नारिंगी अलर्ट आल्यास ५ किलोमीटरच्या तर पिवळा अलर्ट आल्यास १५ किलोमीटरच्या परिसरात वीज वा वादळाचा धोका असतो. जर हिरवा अलर्ट असेल तर संबंधीत युजरच्या स्मार्टफोनचा परिसर हा वादळ वा विजांपासून सुरक्षित असल्याचे हे अ‍ॅप विकसित करणार्‍यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here