विवो व्ही ११ मॉडेलच्या मूल्यात कपात

0
विवो व्ही ११, vivo v 11

विवो कंपनीने आपल्या व्ही ११ या अलीकडेच लाँच केलेल्या स्मार्टफोनच्या मूल्यात दोन हजार रूपयांची कपात करण्याचे जाहीर केले आहे.

आगामी सणासुदीच्या कालखंडात भारतीय ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असल्याचे पाहून कंपन्यांनी आकर्षक ऑफर्स देण्यास प्रारंभ केला आहे. याच्या सोबतीला विविध स्मार्टफोन्सच्या मूल्यातदेखील कपात करण्यात येत आहे. या अनुषंगाने विवो व्ही ११ या मॉडेल्सचे मूल्यदेखील कमी करण्यात आले आहे. हे मॉडेल २२,९९० रूपये मूल्यात लाँच करण्यात आले होते. आता हाच स्मार्टफोन ग्राहकांना २०,९९० रूपयात खरेदी करता येणार आहे. यात व्ही ११ प्रो या मॉडेलप्रमाणेच इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेले आहे. अर्थात, यामधील फिंगरप्रिंट स्कॅनर हे पाठीमागे नसून डिस्प्लेवरच दिलेले आहे. या मॉडेलमधील महत्वाचे दुसरे फिचर म्हणजे यामध्ये वॉटरड्रॉप प्रकारातील नॉच असणारा फुल व्ह्यू डिस्प्ले दिलेला आहे. अर्थात एक डॉट वगळता याचा संपूर्ण पार्श्‍वभाग हा डिस्प्ले म्हणून वापरात आणलेला आहे. हा डिस्प्ले ६.३ इंच आकारमानाचा व फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आहे. यात मिडीयाटेकचा हेलीओ पी ६० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी व इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस एफ/२.० अपर्चरयुक्त १२ मेगापिक्सल्स तर एफ/२.४ अपर्चरयुक्त ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेर्‍यांमध्ये एआर स्टीकर्स, एआय फेस ब्युटी, पोर्ट्रेट मोड आदी फिचर्स देण्यात आले आहेत. हे मॉडेल अँड्रॉइड ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारा आहे. तर यातील बॅटरी ३,३१५ मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here