लेनोव्हो योगा व आयडियापॅड लॅपटॉपची मालिका

0

लेनोव्हो कंपनीने आपल्या योगा व आयडियापॅड या मालिकेतील लॅपटॉपची नवीन मालिका सादर केली असून हे सर्व मॉडेल्स विंडोज या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारे आहेत.

लेनोव्हो योगा ७२० आणि योगा ५२० हे दोन्ही ‘टु-इन-वन’ या प्रकारातील असल्याने ते लॅपटॉप आणि टॅबलेट म्हणून वापरता येणार आहेत. यात कोअर आय-७ हा प्रोसेसर व एक टेराबाईटपर्यंत स्टोअरेज असेल. दोन्हीत फुल एचडी क्षमतेचे डिस्प्ले, फिंगरप्रिंट स्कॅनर, एनव्हिआयडीआयए ग्राफीक कार्ड आदी महत्वाचे फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. योगा ७२० या मॉडेलमध्ये अतिशय उच्च दर्जाचे जेबीएल स्पीकर्स तर योगा ५२० या मॉडेलमध्ये हर्मन स्पीकर्स देण्यात आले आहेत. यात लेनोव्हो अ‍ॅक्टीव्ह पेन हा स्टायलस पेनदेखील वापरणे शक्य आहे.

लेनोव्हो आयडियापॅड ७२०एस, ५२०एस आणि ३२०एस या मॉडेल्समध्येही जेबीएल स्पीकर्स व ब्लॅकलिट कि-बोर्ड प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये असणारी बॅटरी उत्तम दर्जाची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सात तासांचा व्हिडीओ बॅकअप मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर आयडियापॅड ५२० आणि ३२० या मॉडेल्समध्ये एनव्हिआयडीआयए जीफोर्स ९४०एमएक्स ग्राफीक्स कार्ड असल्याने गेमर्ससाठी ते उपयुक्त ठरतील. आयडियापॅड ५२० मध्ये हरमन आडिओ तर ३२०मध्ये डॉल्बी ऑडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात वाय-फाय व युएसबी टाईप-सी आदी फिचर्सचा समावेश असेल.लेनोव्हो योगा मालिकेतील योगा ७२० व ५२० (मूल्य ७४,५०० व ३९,६०० रूपये ); आयडियापॅड ७२०एस, ५२०एस व ३२०एस हे मॉडेल्स (मूल्य ७४,८५०, ४७,४५० व ३४,७५० रूपये ) तर आयडियापॅड ५२० व ३२० (मूल्य ४२,४०० व १७८०० रूपये ) उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here