लेनोव्हो टॅब ७ भारतात सादर

0

लेनोव्हो कंपनीने आपला लेनोव्हो टॅब ७ हा टॅबलेट भारतीय ग्राहकांना ९,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध केला आहे.

लेनोव्हो टॅब ७ या मॉडेलमध्ये ६.९८ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स (एचडी ) आयपीएस डिस्प्ले दिला आहे. यात क्वाड-कोअर मीडीयाटेक एमटी८७३५बी हा प्रोसेसर असेल. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.

लेनोव्हो टॅब ७ या मॉडेलमध्ये ऑटो-फोकससह ५ मेगापिक्सल्सचा मुख्य तर २ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यातील फ्रंट स्पीकर हे डॉल्बी अ‍ॅटमॉस तंत्रज्ञानाने युक्त आहेत. यातील बॅटरी ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा टॅबलेट अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे.
यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क कनेक्टिव्हिटी असून यावरून व्हाईस कॉलींगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय यात थ्री-जी व २-जीचा सपोर्टसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, युएसबी, युएसबी-ओटीजी आदी फिचर्स असतील. लेनोव्हो टॅब ७ हा टॅबलेट ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून ९,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here