लेनोव्हो झेड ५ च्या आगमनाची उत्सुकता शिगेला

0
(लेनोव्हो झेड ५ मॉडेलचे लीक झालेले छायाचित्र)

लेनोव्हो कंपनी ५ जून रोजी आपला झेड ५ हा स्मार्टफोन लाँच करणार असून यात नेमके काय फिचर्स असतील याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लेनोव्हो झेड ५ या मॉडेलबाबत जगभरात कुतुहलाचे वातावरण निर्मित झाले आहे. हा स्मार्टफोन ५ जून रोजी बीजींग शहरात आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीने घोषीत केले आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स असण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने याचे विविध फिचर्स हे अनेक लीक्सच्या माध्यमातून जगासमोर आले आहेत. यातून हा स्मार्टफोन बेझललेस अर्थात कडाविरहीत या प्रकारातील फुल व्ह्यू या प्रकारातील असण्याची शक्यता आहे. तथापि, अलीकडच्या काळात बहुतांश फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये असणारा नॉच यामध्ये नसेल. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यामध्ये आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर केलेला असेल. यातील रॅमबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसली तरी यामध्ये तब्बल चार टेराबाईट (टिबी) इतके इनबिल्ट स्टोअरेज असणार आहे. पार्टीकल तंत्रज्ञानाचा वापर करून इतके मोठे स्टोअरेज यात देण्यात येणार आहे. यामध्ये कुणीही युजर २ हजार एचडी चित्रपट, दीड लाख गाणी अथवा तब्बल १० लाख प्रतिमांचे स्टोअरेज करू शकतो. इतके मोठे स्टोअरेज असणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन ठरणार आहे.

लेनोव्हो झेड ५ या मॉडेलच्या एका टिझरमध्ये यात ४५ दिवसांचा स्टँडबाय टाईम असणारी बॅटरी देण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. अर्थात यामुळे हा स्मार्टफोन जंबो बॅटरीने सज्ज असेल असे मानले जात आहे. या सर्व बाबींचा विचार करता हे मॉडेल दणदणीत फिचर्सने सज्ज असेल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here