लेनोव्होची पॉवर बँक

0

लेनोव्होने १० हजार मिलीअँपिअर क्षमतेची एमपी १०६० ही पॉवर बँक १२९९ रूपये मुल्यात भारतीय ग्राहकांसाठी सादर केली आहे.

लेनोव्हो एमपी १०६० ही पॉवर बँक ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करता येईल. याची खासियत म्हणजे यात एकचदा दोन उपकरणांना चार्ज करण्याची सुविधा असेल. अर्थात यात चार्जींगसाठी दोन पोर्ट असतील. तर इनपुटसाठी एक पोर्ट देण्यात आले आहे. हे मॉडेल आकाराने अतिशय आटोपशीर असून याचे वजन अवघे २०० ग्रॅम इतके आहे. यात टेंपरेचर कंट्रोल हे फिचर इनबिल्ट पध्दतीत देण्यात आले आहे. यामुळे बॅटरी ओव्हर हिट होणार नाही. तर अति चार्जींगमुळे ही पॉवर बँक खराबदेखील होणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे याच्या माध्यमातून चार्ज होणार्‍या उपकरणाला आवश्यक असणारी उर्जाच यातून पुरविण्यात येणार आहे. तर ही पॉवर बँक स्मार्टफोनसह टॅबलेट, कॅमेरे आदी अन्य उपकरणांना चार्ज करण्यास सक्षम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here