लेनोव्होचा किफायतशीर स्मार्टबँड दाखल

0
लेनोव्हो कार्डीओ प्लस एचएक्स०३डब्ल्यू हा स्मार्टबँड, lenovo cardio plus hx03w smartband

लेनोव्होने अतिशय किफायतशीर मूल्य असणारा कार्डीओ प्लस एचएक्स०३डब्ल्यू हा स्मार्टबँड भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

लेनोव्होने भारतीय वेअरेबल्स बाजारपेठेवर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या वर्षाचाच विचार केला असता, एप्रिल महिन्यात एचएक्स०३ कार्डी आणि एचएक्स०३एफ स्पेक्ट्रा हे फिटनेस ट्रॅकर लाँच करण्यात आले. यानंतर जुलै महिन्यात एचएक्स०६ हे मॉडेल लाँच करण्यात आले. आणि आता कार्डीओ प्लस एचएक्स०३डब्ल्यू हा स्मार्टबँड भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. याचे मूल्य १,९९९ रूपये असून याला उद्यापासून (९ सप्टेंबर) अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात येणार आहे. हे मॉडेल वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहे. यात ०.९६ इंच आकारमानाचा व ओएलईडी या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत आकर्षक रंगाचे बदलता येणारे पट्टेदेखील देण्यात आलेले आहेत.

अन्य फिटनेस ट्रॅकर्सप्रमाणे लेनोव्होचा कार्डीओ प्लस एचएक्स०३डब्ल्यू हा स्मार्टबँड देखील युजरच्या विविध शारिरीक हालचालींवर नजर ठेवण्यास सक्षम आहे. यात चाललेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज, स्लीप मॉनिटरींग आदींसह व्यायाम, रनिंग व सायकलींगच्या दरम्यान होणार्‍या शारिरीक हालचालींचे मापन करता येणार आहे. यामध्ये अँटी स्लीप मोड हे अनोखे फिचर देण्यात आले आहे. यात युजरला झोप लागल्यास अलर्टच्या स्वरूपात याला जागी करण्यात येते. ड्रायव्हींग करण्यासह अत्यावश्यक कामांसाठी जागरण आवश्यक असल्यास हे फिचर उपयुक्त ठरणारे आहे. अर्थात यामध्ये हार्ट रेट मॉनिटर हे फिचरदेखील देण्यात आले आहे. याच्या मदतीने कुणीही युजर आपल्या हृदयाच्या हालचालींवर नजर ठेवू शकणार आहे. यात आपल्या फिटनेसबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात युएसबी चार्जींगची सुविधाही देण्यात आलेली आहे. ब्ल्युटुथच्या मदतीने हा फिटनेस ट्रॅकर स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येतो. अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींवरील स्मार्टफोन्स याला कनेक्ट करता येणार आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here