लेनेव्हो झेड ५ स्मार्टफोनचे अनावरण

0

लेनेव्हो कंपनीच्या गेल्या काही दिवसांपासून औत्सुक्याचा विषय बनलेल्या झेड ५ या मॉडेलचे आज अनावरण करण्यात आले. यात फुल व्ह्यू डिस्प्ले व ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लेनोव्हो झेड ५ हे मॉडेल औत्सुक्याचा विषय बनले होते. विशेष करून यात नॉच विरहीत खरा खुरा फुल व्ह्यू डिस्प्ले असेल असे मानले जात होते. तसेच यात ४ टिबी स्टोअरेज असेल असेही लीक्स समोर आले होते. मात्र आज चीनमध्ये सादर करण्यात आलेल्या या मॉडेलमध्ये या दोन्हीपैकी एकही फिचर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील डिस्प्ले हा ६.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २२४६ बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा, १८:७:९ अस्पेक्ट रेशो असणारा व फुल व्ह्यू या प्रकारातील आहे. मात्र याच्या वरील भागात आयफोन-एक्सप्रमाणे नॉच देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर ६३६ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४/१२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिलेली आहे.

लेनाव्हो झेड ५ स्मार्टफोनच्या मागील बाजूस १६ व ८ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. यात ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्राॅइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारा असेल. यामध्ये १८ वॅट क्षमतेची बॅटरी दिलेली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर ४५ दिवसांचा स्टँडबाय टाईम मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे ० टक्के बॅटरी असतांनाही स्मार्टफोन ३० मिनिटांपर्यंत वापरता येणार असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये मिळणार असून नंतर भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये लाँच करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here