लाईव्ह.मी अ‍ॅपचा ‘क्विझबिझ’ गेम शो

0

भारताचा पहिला लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मंच म्हणून ख्यात असणार्‍या लाईव्ह.मी अ‍ॅपने क्विझबिझ या अभिनव शोचे आयोजन केले. या गेम शोचे सूत्रसंचालन यूट्यूबवर लोकप्रिय असलेल्या साहिल खट्टरने केले. त्याने आपल्या मिश्किल विनोदबुद्धीच्या करामतींच्या जोरावर स्पर्धकांचे मनोरंजन तर केलेच शिवाय त्यांना दहा लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम जिंकण्याची नामी संधी देखील दिली.

लाईव्ह.मी हे एक नवीन व्हिडिओ अ‍ॅप आहे जे १७ सेकंद लांबीपर्यंतचे व्हिडिओ बनवणे, शेअर करणे व शोधणे यासाठी समर्पित असलेले अ‍ॅप आहे. अ‍ॅपमध्ये विविध सुविधा दिलेल्या आहेत, जसे की डांस ऑफ, गेमसारखी सुविधा ज्यामध्ये यूझर्सना पुनरावृत्ती करण्यास नृत्याच्या हालचाली दाखवलेल्या आहेत. यूजर गूगल प्ले व अ‍ॅप स्टोर द्वारे लाईव्ह.मी अ‍ॅप डाउनलोड करू शकतात.

क्विझबिझ हे लाईव्ह.मी अ‍ॅपचे सर्वात लोकप्रिय कंटेंट सादरीकरण असून ते बक्षिसांच्या प्रचंड रकमेद्वारे श्रोत्यांना आकर्षित करीत आहे. मागील ३ आठवड्यांपासून क्विझबिझचे सत्र होस्ट करणार्‍या गौरव गेरासारख्या सेलिब्रिटी व्यक्तींना क्विझबिझच्या होस्टच्या स्वरूपात सादर करून अ‍ॅपने आधीच मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. नव्या पिढीचा ताईत असलेल्या साहिल खट्टर यासाठी अगदीच आदर्श ठरला आहे.

लाईव्ह.मीचे मुख्य कार्यकारी अधिकारी युकी ही म्हणाले की, आजच्या तरूणांमध्ये साहिल खट्टर हे एक प्रसिद्ध नाव आहे आणि त्याच्या प्रदर्शनाची विविध वयोगटातींल श्रोत्यांद्वारे प्रशंसा केली जाते. त्याचा निरीक्षणात्मक विनोद आणि प्रत्येक संभाषण उत्तम बनवण्याची अंगभूत हातोटी या अशा गोष्टी आहे ज्याची क्विझबिझ सत्राच्या सहभागींना उत्सुकता होती. यासोबतच हंगामाची सर्वात मोठी बक्षिस रक्कम म्हणजे रू. १० लाख मिळवण्याची संधी हेदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here