लहानशा टेपवर मावणार ३२० टेराबाईट डाटा

0

आयबीएम कंपनीच्या चमूने लहानशा टेपवर तब्बल ३२० जीबी इतका डाटा स्टोअर करण्याची किमया केली असून या माध्यमातून एक नवीन विश्‍वविक्रम प्रस्थापित झाला आहे.

मॅग्नेटीक टेपवर माहितीचा संग्रह करण्याचे तंत्रज्ञान पन्नासच्या दशकापासून प्रचलीत आहे. याचा सर्वात लोकप्रिय अविष्कार कॅसेट रेकॉर्डर टेप आणि व्हिसीआरच्या माध्यमातून जगासमोर आला आहे. आता डिजीटल स्टोअरेजच्या युगात हे तंत्रज्ञान कालबाह्य झाले असून लहानतल्या लहान चीपमध्ये आता अनेक जीबी इतका डाटा स्टोअर करणे शक्य आहे. या पार्श्‍वभूमिवर, आयबीएम कंपनीने तळहातावर मावणार्‍या टेपमध्ये तब्बल ३२० टेराबाईट इतका डाटा स्टोअर करण्यात सफलता मिळवली आहे. यात एका चौरस इंचावर २०१ टेराबाईट माहितीचा संग्रह करण्यात आला असून हा एक नवीन विश्‍वविक्रम बनला आहे. डॉ. मार्क लँट यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या एका चमूने ही कामगिरी पार पाडली आहे. यासाठी आयबीएमने सोनी कंपनीसोबत दीर्घ काळापासून संशोधन केले आहे. ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असून यातूनच हा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

सध्या कमीत कमी जागेत जास्तीत जास्त माहितीचा संग्रह करण्याची जणू काही स्पर्धाच सुरू आहे. स्मार्टफोनसह अन्य बहुतांश उपकरणांमध्ये स्टोअरेज क्षमता हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. यामुळे अगदी लहान जागेत ३२० टिबी इतकी माहिती साठवून आयबीएमने तंत्रज्ञान जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here