लवकरच संगणकावरूनही वापरा फेसबुक स्टोरीज

0

फेसबुक या सोशल साईटने आपले स्टोरीज हे फिचर डेस्कटॉपच्या युजर्सला वापरण्याची सुविधा देण्याचे संकेत दिले असून काही जणांच्या माध्यमातून याची चाचणी घेतली जात आहे.

फेसबुक या सोशल साईटवरील स्टोरीज म्हणजे २४ तासांपर्यंत टिकणारी प्रतिमा, व्हिडीओ वा अ‍ॅनिमेशन होय. स्नॅपचॅट या लोकप्रिय फिचरची नक्कल करत स्टोरीज हे फिचर युजर्सला देण्यात आले आहे. सध्या याची विविध रूपे फेसबुकची मालकी असणार्‍या इन्स्टाग्राम, व्हाटसअ‍ॅप, फेसबुक मॅसेंजर आदींवर देण्यात आले आहेत. तर काही महिन्यांपुर्वी स्मार्टफोनवरून फेसबुक वापरणार्‍या युजर्सला हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. कुणीही युजर टाईमलाईनच्या वर मित्रांची प्रोफाईल प्रतिमा असणार्‍या गोलाकार आकारांच्या आयकॉनच्या स्वरूपात स्टोरीज शोधू शकतो. यावर क्लिक केल्यावर कुणीही संबंधीत युजरची स्टोरीज शोधू शकतो. मात्र आता स्मार्टफोनच्या पलीकडे स्टोरीज या फिचरची व्याप्ती वाढण्याचे संकेत मिळाले असून लवकरच डेस्कटॉप संगणकावरून फेसबुक वापरणार्‍यांना ही सुविधा मिळणार आहे.

याबाबत टेकक्रंच या पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार लवकरच संगणकावरून फेसबुक वापरणार्‍यांना स्टोरीज हे फिचर वापरता येणार आहे. सध्या काही युजर्सला हे फिचर आपल्या न्यूजफिडच्या उजव्या बाजूला वर गोलाकार आकारांच्या आयकॉनच्या स्वरूपात स्टोरीज दिसू लागल्या आहेत. या फिचरची व्याप्ती लवकरच वाढून सर्व युजर्स याचा वापर करू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here