लवकरच येणार विवो व्ही ९

0

विवो कंपनी भारतीय ग्राहकांसाठी लवकरच विवो व्ही ९ हा स्मार्टफोन लाँच करणार असून यात उत्तम सेल्फी कॅमेर्‍यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्स असतील.

विवो व्ही ९ हे मॉडेल २७ मार्च रोजी भारतीय ग्राहकांसाठी नवीन मॉडेल सादर करणार आहे. या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या टिझर्समधून या आगामी मॉडेलविषयी बर्‍यापैकी माहिती जगासमोर आली आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे विवो व्ही ९ या स्मार्टफोनमध्ये २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. तर याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. यात नेमक्या किती मेगापिक्सल्सचे कॅमेरे असतील याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

विवो व्ही ९ या स्मार्टफोनचा लूक हा आयफोन-एक्स या मॉडेलप्रमाणे फुल व्ह्यू या प्रकारातील असेल अशी माहिती समोर आली आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे असेल. याचे मूल्य २५ हजार रूपयांच्या आसपास असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here