लवकरच येणार टायझेन 3.0

0

सॅमसंग कंपनी लवकरच आपल्या टायझेन या ऑपरेटींग सिस्टीमची तिसरी आवृत्ती लाँच करणार असून याबाबत टेक्नोवर्ल्डमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सॅमसंगने प्रारंभी बाडाच्या माध्यमातून ऑपरेटींग प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न फसला होता. यानंतर 2013 साली बाडाचे विसर्जन करत टायझेन या लिनक्सवर आधारित प्रणालीची पहिली आवृत्ती सादर करण्यात आली. आता या प्रणालीची तिसरी आवृत्ती सादर होणार आहे. ही सिस्टीम बहुउपयोगी असल्याने स्मार्टफोनच नव्हे तर पीसी, टॅबलेट, लॅपटॉप, स्मार्ट टिव्ही/फ्रिज व अन्य उपकरणे, प्रिंटर, कॅमेरा, वाहनांमधील इन्फोटेनमेंट सिस्टीम्स तसेच इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजेच आयओटीवर आधारित विविध उपकरणांमध्ये याचा वापर करण्यात येतो. एका अर्थाने ती अँड्रॉइडपेक्षा वैविध्यपूर्ण आणि अत्यंत लवचीक अशी प्रणाली आहे. लवकरच या प्रणालीची तिसरी आवृत्ती सादर करण्यात येणार आहे. यात 64 बीट सपोर्ट, व्हाईस कमांडची सुविधा, एका उपकरणावर मल्टीपल युजर्सला लॉगीनची सुविधा आदी फिचर्स असतील. स्मार्टवॉच, स्मार्ट टिव्ही आदींसह विविध उपकरणांमध्ये ही प्रणाली उपयुक्त सिध्द होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here