लवकरच येणार जिओचे लॅपटॉप

0
reliance_jio

रिलायन्स जिओ लवकरच अत्यंत किफायतशीर मूल्य असणारे लॅपटॉप बाजारपेठेत उतारणार असल्याची खात्रीलायक माहिती आता समोर आली आहे.

गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात रिलायन्सने जिओफोन सादर करून धमाल उडवून दिली. यासाठी जिओने क्वॉलकॉम या प्रोसेसर उत्पादक कंपनीशी करार केला होता. आता याच कंपनीशी करार करून रिलायन्स जिओ लवकरच भारतीय ग्राहकांसाठी अतिशय स्वस्त दरात लॅपटॉप सादर करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असून याबाबत इकॉनॉमिक टाईम्सने वृत्त दिले आहे. हे लॅपटॉप क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन या मालिकेतील प्रोसेसवर चालणारे असतील. हे लॅपटॉप विंडोज १० प्रणालीवर चालणारे असून यात विशेष करून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे टुल्स दिलेले असतील अशी माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यामध्ये फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. अर्थात या माध्यमातून रिलायन्स जिओच्या सेल्युलर सेवेसाठी नवीन ग्राहक मिळवण्याची तजवीजदेखील करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

रिलायन्स जिओने आधीच अत्यंत किफायतशीर पॅक आणि याच प्रकारातील हँडसेटच्या माध्यमातून अन्य कंपन्यांना धडकी भरवली आहे. यात आता ही कंपनी लॅपटॉप उत्पादनातही पदार्पण करत असल्यामुळे या क्षेत्रातदेखील दरयुध्द सुरू होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here