लवकरच येणार अँड्रॉईड एम

0

अँड्रॉईडचे पुढील अर्थात ‘अँड्रॉईड एम’ हे व्हर्शन गुगलच्या अगामी आय/ओ परिषदेत सादर होण्याची शक्यता आहे.

android-m

सध्या अँड्रॉईडचे लॉलिपॉप हे अपडेटेड व्हर्शन आहे. मात्र जगातील बहुतांश स्मार्टफोन आधीच्याच व्हर्शनवर चालत आहेत. याचाच अर्थ अद्यापही बहुतांश स्मार्टफोनमध्ये लॉलिपॉप व्हर्शन नाही. या पार्श्‍वभुमीवर गुगलतर्फे या महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात आलेल्या आय/ओ परिषदेत अँड्रॉईड या प्रणालीच्या ‘एम’ या नवीन व्हर्शनची घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबत गुगलतर्फे अधिकृत घोषणादेखील करण्यात आली आहे. अर्थात यात नेमके कोणते फिचर्स असतील याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यात नेमके काय असेल याबाबत डेव्हलपर्समध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here