लवकरच मॅकबुक एयरची किफायतशीर आवृत्ती

0

अ‍ॅपल कंपनी लवकरच १३ इंची मॅकबुक एयर या लॅपटॉपची किफायतशीर आवृत्ती सादर करणार आहे.

२००८ साली मॅकबुक एयर हा लॅपटॉप पहिल्यांदा लाँच करण्यात आला होता. यानंतर याच्या अनेक आवृत्त्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. तथापि, २०१५ पासून यातल्या १३ इंची मॉडेलची कोणतीही नवीन आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात आलेली नाही. या पार्श्‍वभूमिवर, अ‍ॅपल कंपनी लवकरच थोड्या किफायतशीर मूल्यात मॅकबुक एयरची नवीन आवृत्ती सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मॅकबुक एयरच्या नवीन आवृत्तीमध्ये काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात येणार असल्याचेही मानले जात आहे. साधारणपणे २०१८च्या मध्यावर ही नवीन आवृत्ती जागतिक बाजारपेठेत उतारण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here