लवकरच भारतात मिळणार हुआवे मेट २० प्रो !

0
हुआवे मेट प्रो, huawei mate pro

हुआवेने अलीकडेच सादर केलेला हुआवे मेट २० प्रो हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करण्यात येणार आहे.

हुआवे कंपनीने अलीकडेच लंडन शहरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हुआवे मेट प्रो या मॉडेलला लाँच केले आहे. पहिल्यांदा हा स्मार्टफोन मोजक्या राष्ट्रांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. तर भारतात हे मॉडेल नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आता समोर आली आहे. अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलच्या एका पेजवर याचा टिझरदेखील सादर करण्यात आला आहे. परिणामी हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त अमेझॉनवरूनच खरेदी करता येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हे मॉडेल उच्च श्रेणीतील असून याचे मूल्य १०५० युरो इतके आहे. म्हणजेच भारतातही याचे मूल्य ८० हजारांच्या आसपास राहू शकते. अर्थात इतके जास्त मूल्य असले तरी यातील फिचर्सदेखील तितक्याच तोलामोलाचे आहेत. यात लक्षणीय बाब ही यातील कॅमेरा आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील प्राथमिक कॅमेरा हा ४० मेगापिक्सल्सचा आहे. तर उर्वरित दोन्ही कॅमेरे हे २० आणि ८ मेगापिक्सल्सचे आहेत. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या एकत्रीत माध्यमातून हा कॅमेरा अतिशय सजीव वाटणार्‍या प्रतिमा घेण्यास सक्षम असल्याचा दावा हुआवे कंपनीतर्फे करण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, हुआवे मेट प्रो या मॉडेलमध्ये ६.३९ इंच आकारमानाचा आणि क्वॉड एचडी प्लस म्हणजेच ३१२० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १५:५:९ असा आहे. यामध्ये किरीन ९८० हा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज २५६ जीबी असून ते नॅनो मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. यात इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आलेले आहे. यामध्ये आयफोन-एक्सप्रमाणे फेसियल रिकग्नीशन प्रणालीदेखील दिलेली आहे. यातील बॅटरी ९,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइड ९.० पाई या आवृत्तीवर चालणारे आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here