लवकरच भारतात मिळणार ओप्पो ए८३

0

ओप्पो कंपनीने अलीकडेच सादर केलेला ओप्पो ए८३ हा स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.

ओप्पो कंपनी १७ जानेवारी रोजी बंगळुरू शहरातील एका कार्यक्रमात नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. याप्रसंगी नेमके कोणते मॉडेल लाँच करण्यात येईल याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आलेली नाही. तथापि, विश्‍वासू सूत्रांच्या माहितीनुसार या कार्यक्रमात ओप्पो ए८३ हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर केले जाईल असे मानले जात आहे. ओप्पो ए८३ स्मार्टफोनमध्ये कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजियन्स तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्टफोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात १८:९ गुणोत्तराचे प्रमाण असणारा ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा (१४४० बाय ७२० पिक्सल्स), २.५डी वक्राकार ग्लास डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे. या मॉडेलची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.

ओप्पो ए८३ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या कलर ओएस ३.२ वर चालणार आहे. ओप्पो ए८३ स्मार्टफोनमधील मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हाच कॅमेरा फेस अनलॉक फिचरमध्ये वापरण्यात आला आहे. यात युजरच्या चेहर्‍यावरील १२८ पॉइंटच्या आधारे अवघ्या ०.१८ सेकंदात फोन अनलॉक केला जातो. तर यात ३०९० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. याचे मूल्य १५ हजारांच्या आत असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here