लवकरच बाजारपेठेत येणार विवो वाय ९५

0

विवो वाय ९५ हा स्मार्टफोन लवकरच बाजारपेठेत सादर करण्यात येणार असून याला ऑफलाईन या प्रकारात उपलब्ध करण्यात येणार आहे.

विवो वाय ९५ या मॉडेलचे आजवर अनेक लीक्स समोर आले असले तरी या मॉडेलचे ग्लोबल लॉंचींग अद्याप करण्यात आलेले नाही. तथापि, आता समोर आलेल्या विश्‍वसनीय माहितीच्या आधारे हे मॉडेल येत्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माहितीचा विचार केला असता याचे मूल्य १५ हजारांच्या आसपास असू शकते. हा मिड रेंजमधील स्मार्टफोन आहे. यातील डिस्प्ले हा ६.२२ इंच आकारमानाचा असून यावर हॉलो या प्रकारातील नॉच असणार आहे. या नॉचमध्ये सेन्सर आणि फ्रंट कॅमेरा असेल. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

विवो वाय ९५ या मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. यामध्ये १३ आणि ५ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश असेल. तर यातील फ्रंट कॅमेरा हा ८ मेगापिक्सल्सचा असणार आहे. हे मॉडेल ऑफलाईन म्हणजेच देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here