लवकरच ट्विट सेव्ह करण्याची सुविधा

0
twitter

ट्विटर लवकरच आपल्या युजर्ससाठी ट्विट सेव्ह करून ते बुकमार्क करण्याची सुविधा प्रदान करणारे फिचर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ट्विटरचे सहसंस्थापक तथा सीईओ जॅक डोर्से यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या संकेतस्थळावर युजर्सला नेमके कोणते फिचर्स हवेत? याबाबत विचारणा केली होती. यात ट्विट संपादनासोबत ते सेव्ह/बुकमार्क करण्याची सुविधा देण्याची मागणी बर्‍याच युजर्सनी केली होती. अर्थात आजवर संपादनाची सुविधा देण्यात आली नसली तरी आता मात्र कोणतेही ट्विट सेव्ह करण्याची सुविधा देण्याचे संकेत दिले आहेत. अनेकदा काही महत्वाचे ट्विट नंतरदेखील कामा पडणारे असल्यामुळे ते सेव्ह करण्याची आवश्यकता भासते. मात्र आजवर अशी सुविधा नसल्यामुळे ही बाब शक्य नव्हती. तथापि, आता मात्र अशी सुविधा मिळणार असल्याचे संकेत मिळाले असून बझफिड या टेक पोर्टलला सध्या प्रयोगात्मक अवस्थेत असणार्‍या या फिचरची माहिती मिळाली असून त्यांनी याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. तर ट्विटरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे नवीन फिचर ‘सेव्ह फॉर लेटर’ या नावाने लवकरच घोषीत करण्यात येणार आहे.

ट्विटरचे असोसिएट प्रॉडक्ट मॅनेजर जेसर शाह यांनी या नवीन फिचरची झलक दर्शविणारा व्हिडीओ जाहीर केला आहे. यात प्रत्येक ट्विटवर ड्रॉप डाऊन पध्दतीने खाली गेल्यावर ‘अ‍ॅड टू बुकमार्क्स’ हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यावर संबंधीत ट्विट सेव्ह होणार असून ते नंतर केव्हाही पाहता येणार आहे. नंतर कुणीही युजर आपल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यावर त्याला खालील बाजूस सर्व बुकमार्क केलेले ट्विट पाहता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here