लवकरच एलजीचीही स्वयंचलीत कार

0

एलजी कंपनीने हिअर टेक्नॉलॉजीसोबत स्वयंचलीत कार प्रणाली विकसित करण्याचे जाहीर केले आहे.

जगभरात सध्या स्वयंचलीत म्हणजेच ड्रायव्हरविना चालण्यास सक्षम असणार्‍या चारचाकी वाहनाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. गुगलने यात आघाडी घेतली असून या कंपनीच्या अनेक मॉडेल्सची अगदी गजबजलेल्या रस्त्यांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. याच्या पाठोपाठ अ‍ॅपलसह अन्य कंपन्यांनीही या संशोधनाला प्रारंभ केला आहे. नंतर यात कार उत्पादकांनीही प्रवेश केला. तर आता एलजी सारख्या उपकरणांच्या निर्मितीत अग्रेसर असणार्‍या कंपनीनेही पदार्पण करण्याचे संकेत दिले आहेत. या अनुषंगाने एलजीने हिअर टेक्नॉलॉजी या डिजीटल मॅपींग आणि लोकेशन सर्व्हीस पुरवठादार कंपनीसोबत सहकार्याचा करार केला आहे. या दोन्ही कंपन्या एकत्रीतपणे टेलिमॅटीक्स या प्रकारातील सेवेच्या माध्यमातून स्वयंचलीत कारच्या निर्मितीला हातभार लावणार आहेत. याच्या अंतर्गत जीपीएस, ब्ल्यु-टुथ आणि वाय-फाय तंत्रज्ञानासह रडार आणि सेन्सर्सचा वापर केला जाणार आहे. ही प्रणाली आगामी ५-जी या नेटवर्क तंत्रमानावर आधारित असल्याचे वेगवान असेल. स्वयंचलीत कारमध्ये ही प्रणाली अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here