लँडलाईन फोनही बनणार स्मार्ट

0
(प्रतिकात्मक छायाचित्र)

जगातील सर्व उपकरणे स्मार्ट होत असतांना आता लँडलाईनदेखील स्मार्ट होणार असल्याचे संकेत मिळाले असून यासाठी बीएसएनएलने पुढाकार घेतला आहे.

अत्यंत किफायतशीर दरातील स्मार्टफोनमुळे देशातील दूरध्वनीधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर, लँडलाईन फोनमध्ये बदल करण्याचे संकेत आता मिळाले आहेत. बीएसएनएलने याचा पहिला प्रयोग राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात सुरू केला आहे. याच्या अंतर्गत येथील टेलीफोन एक्सचेंजला ‘नेक्स्ट जनरेशन नेटवर्कींग’ म्हणजेच ‘एनजीएन’मध्ये परिवर्तीत करण्यात येत आहे. यामुळे आता ग्राहकाला आपल्या दूरध्वनीवरून व्हिडीओ कॉलींग, एसएमएस आणि चॅटींग आदी सुविधा मिळणार आहेत. याच्या जोडीला ग्राहक आपल्या हवी असणारी पर्सनल रिंगबॅक टोनदेखील निवडू शकतो. अर्थात यासाठी ग्राहकाला त्याचा विद्यमान दूरध्वनी संच बदलून नवीन ‘आयपी फोन’ घ्यावा लागणार आहे. हे मॉडेल बीएसएनएलच उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान, बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना त्यांच्या दूरध्वनीवर केलेला कॉल हा मोबाईल हँडसेटवर रिसिव्ह करण्याची सुविधादेखील दिली आहे. यामुळे ग्राहक घरी नसतांना तो आपल्या लँडलाईनवर आलेला कॉल मोबाईलवर घेऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here