रोपोसोचे आता ‘नेशन स्पीक्स’ चॅनेल

0

रोपोसोने आता ‘नेशन स्पीक्स’ या नावाने नवीन चॅनल सुरू केले असून या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणार्‍या विविध समस्यांवर आवाज उठविण्याची संधी प्रदान केली आहे.

देशातील प्रथम ‘टीव्ही बाय द पीपल’ म्हणून ख्यात असणार्‍या रोपोसोने नेहमीच युजर्सना इच्छित असलेल्या कन्टेन्टला महत्व दिले आहे. तरुणांना आवाज उठवण्यास मदत करण्याच्या हेतूसह हा रोपोसोने आता नवीन चॅनेल ‘नेशन स्पीक्स’ सुरू केले आहे. हे चॅनेल युजर्सना त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणार्‍या समस्यांविरोधात आवाज उठवण्याची संधी देणार आहे. हे चॅनेल विशेष करून तरुण युजर्सना डोळ्यासमोर ठेवून कार्यान्वित करण्यात आले आहे. रोपोसोला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यात वैयक्तिक कथा आणि व्हिडिओपासून विलक्षण फोटोंपर्यंत रोपोसो हा इतर समविचारी प्रेक्षकांसोबत संवाद साधण्याकरिता लाखो भारतीयांचा पसंतीचा मंच बनला आहे. यातच नेशन स्पीक्सच्या माध्यमातून याला अभिव्यक्तीचा नवीन आयाम देण्यात आला आहे.

या नवीन चॅनेलच्या संकल्पनेबाबत बोलताना, रोपोसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह संस्थापक मयंक भंगाडिया म्हणाले की, आमच्या युजर्सना याच्या रूपाने आम्ही सशक्त माध्यम प्रदान केले आहे. यामुळे रोपोसोचे स्थान अधिक पक्के बनणार असल्याचा आशावाददेखील त्यांनी प्रकट केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here