रेल्वेचे ‘ऑल इन वन’ अ‍ॅप

0

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी ‘ऑल इन वन’ या प्रकारातील रेल सारथी हे अ‍ॅप सादर केले असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.

खरं तर रेल्वे मंत्रालयातर्फे आधीपासूनच अनेक अ‍ॅप लाँच करण्यात आले आहेत. अर्थात यात प्रत्येक सेवेसाठी स्वतंत्र अ‍ॅप इन्टॉल करून वापरावे लागत होते. मात्र रेल सारथी अ‍ॅपमध्ये रेल्वेच्या सर्व सेवांचा समावेश करण्यात आला असल्याने अन्य दुसरे कोणतेही अ‍ॅप वापरण्याची गरज उरणार नाही. यात विविध प्रकारच्या इनक्वायरीज, तिकिट बुकींग, प्रवासातील स्वच्छता/साफसफाईसह अन्य सुविधा तसेच खाद्य पदार्थांच्या ऑर्डरचा समावेश आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपवरून रेल्वेचेच नव्हे तर हवाई प्रवासाचे तिकिटही बुक करता येईल. तसेच यात महिला सुरक्षा, तक्रारी, सूचना आदींची सुविधाही असेल. सध्या हे अ‍ॅप अँड्रॉइडवर लाँच करण्यात आले असले तरी लवकरच ते आयओएस प्रणालीसाठीही सादर होणार असल्याचे वृत्त आहे.

डाऊनलोड लिंक

अँड्रॉइड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here