रिलायन्स जिओफायबर सेवा लवकरच सुरू होणार

0

प्रचंड उत्सुकता लागून असणारी रिलायन्स कंपनीची जिओफायबर सेवा पुढील महिन्यात सुरू होणार असून याच्या अंतर्गत तब्बल १०० मेगाबाईट प्रति-सेकंद इतक्या वेगाने इंटरनेटचा वेग मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रिलायन्सच्या जिओफायबर सेवेबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या दिल्ली आणि मुंबईसह देशातील १० शहरांमध्ये काही युजर्सच्या माध्यमातून याची चाचणी घेतली जात आहे. या पार्श्‍वभूमिवर, मार्च महिन्यापासून देशभरात या सेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत ‘टेलिकॉम टॉक’ या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार रिलायन्सने जिओफायबर सेवा लाँच करण्याची पूर्वतयारी केलेली आहे. यात ग्राहकांना ऑप्टीकल फायबरच्या मदतीने ब्रॉडबँड इंटरनेटची सेवा पुरविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १०० मेगाबाईट प्रति-सेकंद इतका वेग असेल असे कंपनीने जाहीर केले आहे. सध्या काही युजर्सला याची ‘प्रिव्ह्यू ऑफर’ देण्यात आली आहे. यात रिलायन्सने जिओ सेवा सुरू करतांना ज्या आक्रमक पध्दतीने प्रवेश केला त्याच प्रकारे जिओफायबरचे लाँचीग केले जाणार आहे.

रिलायन्स जिओफायबरच्या प्रिव्ह्यू ऑफरमध्ये ग्राहकाला दरमहा १०० जीबी मोफत डाटा देण्यात येत आहे. यानंतर ६०० जीबी डाटासाठी ५०० रूपये प्रति-महा तर १००० जीबी डाटासाठी २,००० रूपये प्रति-महिना इतकी आकारणी करण्यात येणार आहे. या मर्यादेपर्यंत १०० एमबीपीएसचा वेग मिळणार असून यानंतर मात्र एक मेगाबाईट प्रति-सेकंद इतक्या वेगाने ब्रॉडबँड सेवा मिळणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here