रिच अल्युरे राईज २ मर्यादीत आवृत्ती सादर

0

रिच मोबाईल या कंपनीने आपला अल्युरे राईज २ मर्यादीत आवृत्ती हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

रिच मोबाईल कंपनीने अलीकडेच अल्युरे राईज हा स्मार्टफोन लाँच केला होता. यानंतर रिच अल्युरे राईज २ हे मॉडेल लिमिटेड एडिशनच्या स्वरूपात बाजारपेठेत उतारले आहे. याचे मूल्य ५,९९९ रूपये आहे. यासोबत रिलायन्स जिओने २२०० रूपयांचा कॅशबॅक जाहीर केला आहे. रिच अल्युरे राईज २ मर्यादीत आवृत्तीमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये क्वॉड कोअर प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात फेस अनलॉक फिचरदेखील दिलेले आहे. यातील बॅटरी २६०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर चालणारे आहे.

रिच अल्युरे राईज २ मर्यादीत आवृत्तीत फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स आहेत. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here