रिको कंपनीच्या प्रोजेक्टरची नवीन मालिका दाखल

0

रिको कंपनीने आपल्या ‘पीजे २४४०’ या मालिकेतील तीन कॉम्पॅक्ट प्रोजेक्टर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य ३२,४५० रूपयांपासून सुरू होणारे आहे.

रिको कंपनीने पीजे एस२२४४०, पीजे एक्स२४४० आणि पीजे डब्ल्यूएक्स२४४० हे तीन प्रोजेक्टर्स अनुक्रमे ३२,४५०; ३७,७६० आणि ४५,९१० रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध केले आहेत. या सर्व मॉडेल्समध्ये डिजीटल लाईट प्रोसेसिंग म्हणजे ‘डीएलपी’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने अतिशय सुस्पष्ट प्रतिमांचे ३० ते ३०० इंच आकारमानांच्या पार्श्‍वभागावर प्रोजेक्शन करणे शक्य असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याच्या मदतीने व्हिडीओज, प्रतिमा, विविध प्रेझेंटेशन्स आदींना सादर करता येणार आहे.

रिको पीजे एस२२४४० हे यातील एंट्री लेव्हलचे मॉडेल असून याची क्षमता ३००० ल्युमेन्स इतकी असेल. यात १०,०००:१ इतका कॉन्ट्रास्ट रेशो प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने एसव्हिजीए म्हणजे ८०० बाय ६०० पिक्सल्स क्षमतेचे तसेच ४:३ अस्पेक्ट रेशो असणार्‍या प्रतिमांचे प्रोजेक्शन करता येईल. याचे वजन २.६ किलो असून याला एचडीएमआय कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.

रिको पीजे एक्स२२४४० या मॉडेलमध्ये एक्सजीए म्हणजेच १०२४ बाय ७६८ पिक्सल्स क्षमतेचे तर रिको पीजे डब्ल्यूएक्स २२४४० या मॉडेलमध्ये डब्ल्यूएक्सजीए म्हणजेच १२८० बाय८०० पिक्सल्स क्षमतेचे प्रक्षेपण करता येणार आहे. या दोन्ही प्रोजेक्टरमध्ये १६:१० हा अस्पेक्ट रेशो देण्यात आला आहे. यात एचडीएमआयच्या सोबत एमएचएल पोर्टदेखील प्रदान करण्यात आले आहे. यामुळे संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, डीव्हीडी/ब्ल्यू-रे प्लेअर आदी उपकरणेदेखील याला कनेक्ट करता येतील. विशेष म्हणजे यांना वाय-फायचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे. यासोबत थ्री-डी प्रोजेक्शनचे टुल ऑप्शनल या प्रकारात देण्यात आले आहे. याच्या मदतीने कॅड ड्रॉइंग्ज, ब्ल्यु-प्रिंट आदींनाही पाहता येणार आहे. तिन्ही मॉडेल्समध्ये अतिशय दर्जेदार स्पीकर देण्यात आले आहे. यासोबत याला बाह्य साऊंड सिस्टीमशी नेक्ट करण्याची सुविधादेखील असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here