रिअलमीच्या ४० लाख स्मार्टफोन्सची विक्री

0
ओप्पो रिअलमी ,oppo realme

ओप्पोची मालकी असणार्‍या रिअलमी या ब्रँडच्या विविध स्मार्टफोन्सच्या तब्बल ४० लाखांपेक्षा जास्त स्मार्टफोन्सची विक्री झाल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

अवघ्या काही महिन्यांमध्येच रिअलमी ब्रँडने भारतीय बाजारपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून येत आहे. रिअलमी १, रिअलमी २, रिअलमी २ प्रो, रिअलमी सी१ आणि रिअलमी यू१ आदी विविध मॉडेल्सला अतिशय उदंड प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर, रिअलमी कंपनीने तब्बल चार दशलक्षांपेक्षा जास्त मॉडेल्सची विक्री केल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी रिअलमी कंपनीने ७ ते ९ जानेवारीच्या दरम्यान रिअलमी यो डेज घोषीत करण्यात आला आहे. या कालखंडाता रिअलमी यू १ फायरी गोल्ड या मॉडेलला लाँच करण्यात येणार आहे. याशिवाय, रिअलमी इयरबडस् आणि बॅकपॅकही लाँच करण्यात येणार आहे. याशिवाय, या कालखंडात रिअलमीच्या विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती प्रदान करण्यात येणार आहेत.

रिअलमी ब्रँड हा ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून लौकीकास आलेला आहे. दरम्यान, या वर्षी रिअलमीने २०१९ मध्ये ऑफलाईन बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे संकेतदेखील मिळाले आहेत. या अनुषंगाने दीडशे शहरांमधील तब्बल २० हजार शॉपीजमधून रिअलमीचे मॉडेल्स उपलब्ध करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here