यू युफोरिया स्मार्ट टिव्ही बाजारपेठेत दाखल

0
यू युफोरिया स्मार्ट टिव्ही , yu yuphoria smart tv

यू टेलिव्हेन्चरने आता टिव्ही उत्पादाच्या क्षेत्रात पदार्पण केले असून ग्राहकांसाठी स्मार्ट टिव्ही सादर केला आहे.

मायक्रोसॉफ्टची उपकंपनी असणार्‍या यू टेलिव्हेन्चरने स्मार्टफोनच्या बाजारपेठेत आधीच पदार्पण केले आहे. या ब्रँडच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या मॉडेल्सला चांगला प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर या कंपनीने आता टिव्ही उत्पादनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. या अनुषंगाने बाजारपेठेत यू युफोरिया स्मार्ट टिव्ही हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे. याचे मूल्य १८,४९९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. यात ४० इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यावर ग्राहक आपल्या स्मार्टफोनवरील कंटेंट स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पाहू शकणार आहे. यासाठी यामध्ये खास फिचर देण्यात आलेले आहे. याच्या मदतीने व्हिडीओजसह गेमींगचाही आनंद घेता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्मार्टफोनवरूनच टिव्हीचे नियंत्रण करण्याची सुविधा यामध्ये प्रदान करण्यात आलेली आहे.

यामध्ये अ‍ॅप्टॉइड हे अ‍ॅप स्टोअर देण्यात आलेले आहे. यावरील विविध अ‍ॅप्स हे युजर आपल्या स्मार्ट टिव्हीवर इन्स्टॉल करून वापरू शकणार आहे. यामध्ये क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आलेला आहे. एयर प्ले या सुविधेच्या मदतीने याला अ‍ॅपल कंपनीची उपकरणे कनेक्ट करता येतील. सेटटॉप बॉक्स, ब्ल्यू-रे प्लेअर आणि गेमिंग कन्सोलला कनेक्ट करण्यासाठी यामध्ये तीन एचडीएमआय पोर्ट दिलेले आहेत. हार्ड ड्राईव्हसह अन्य उपकरणांना संलग्न करण्यासाठी यामध्ये दोन युएसबी पोर्ट दिलेले आहेत. तर लॅपटॉपला कनेक्ट करण्यासाठी यात एक व्हिजीए पोर्टदेखील दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here