युट्युबवर जीआयएफयुक्त व्हिडीओ प्रिव्ह्यू

0
youtube

युट्युबने आपल्या युजर्ससाठी जीआयएफ अ‍ॅनिमेशनने युक्त असणारा व्हिडीओ प्रिव्ह्यू पाहण्याची सुविधा प्रदान केली आहे.

युट्युब गेल्या काही महिन्यांपासून जीआयएफ अ‍ॅनिमेशनयुक्त व्हिडीओ प्रिव्ह्यूची चाचणी घेत आहे. आता जगभरातील युजर्सला ही सुविधा क्रमाक्रमाने प्रदान करण्यात येत आहे. युट्युबने आपल्या युजर्ससाठी आजवर कोणत्याही व्हिडीओचा प्रिव्ह्यू हा थंबनेल अर्थात लहान प्रतिमेच्या माध्यमातून दर्शविण्याची सुविधा दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून युट्युबवर जीआयएफ प्रिव्ह्यूची चाचणी सुरू होती. यात युट्युबच्या पेजवरील कोणत्याही व्हिडीओवर कर्सर नेला असता तीन सेकंदाचे अ‍ॅनिमेशन दिसते. अर्थात यात त्या व्हिडीओतील कंटेंटचा समावेश असतो. यामुळे संबंधीत व्हिडीओचा लाईव्ह व्ह्यू दिसत असून तो आकर्षक असल्याने युजर्सच्या पसंतीस पडण्याची शक्यता आहे. क्रोम या ब्राऊजर सध्या हे फिचर दिसू लागले असून येत्या कालखंडात अन्य सर्व युजर्ससाठी हे फिचर मिळेल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here