युट्युबवर जाहिरातींचा त्रास होणार कमी !

0

युट्युबने आता युजर्ससाठी डोकेदुखी ठरणार्‍या जाहिरातींचा त्रास कमी करण्यासाठी एका नाविन्यपूर्ण फिचरची चाचणी सुरू केली आहे.

युट्युबवरी जाहिराती हा या संकेतस्थळासाठी उत्पन्न मिळवण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. साधारणपणे कोणताही व्हिडीओ सुरू होण्याआधी वा व्हिडीओच्या दरम्यान जाहिराती दाखविण्यात येतात. यातील काही जाहिराती या पूर्णपणे पाहणे बंधनकारक असते. तर काहींना स्कीप करण्याची सुविधा दिलेली असते. आता मात्र हा पॅटर्न थोड्या प्रमाणात बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात युट्युबने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे.

या नवीन सुधारणेच्या अंतर्गत आता युट्युबच्या युजर्सला व्हिडीओ सुरू होण्याआधी एकाऐवजी दोन जाहिरातींना दाखविले जाणार आहे. याला अ‍ॅड-पॉड असे नाव देण्यात आलेले आहे. या दोन्ही जाहिराती पूर्णपणे पाहिल्यास संबंधीत युजरला पुढील व्हिडीओ पाहतांना जाहिराती दाखविण्यात येणार नाहीत. अर्थात या दोन्ही जाहिराती पाहिल्यामुळे त्या युजरचा पुढील त्रास वाचणार आहे. तर कुणाला हा पर्याय नको असल्यास त्याला जाहिराती स्कीप करण्याची सुविधादेखील मिळणार असल्याचे या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत प्रदान करण्यात आले आहे. अर्थात काही युजर्ससाठीच याला लागू करण्यात आले असून नंतर मात्र याला सर्व युजर्ससाठी देण्यात येणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here