युएसबी चावीच्या मदतीने करा ट्विटरवर लॉगीन

0
युएसबी लॉगीन, usb login

एखाद्या युएसबी चावीच्या मदतीने ट्विटरवर लॉगीन करता येईल यावर आपला विश्‍वास बसणार नाही. तथापि, आता ही बाब शक्य झालेली आहे.

ट्विटरवर लॉगीन करण्यासाठी आपल्याला लॉगीन आयडी आणि पासवर्डची आवश्यकता असते. याशिवाय कुणीही याला वापरू शकत नाहीच. तथापि, आता यापेक्षा अतिशय वेगळी अशी पध्दत वापरून ट्विटर वापरता येणार आहे. यासाठी युजरला युएसबी की चा वापर करावा लागणार आहे. यासाठी युजरला युबीको कंपनीने तयार केलेल्या युएसबी स्टीकच्या स्वरूपातील चावीचा वापर करावा लागणार आहे. याबाबत ट्विटरने अधिकृत घोषणा केली आहे. तसेच ही नवीन सिक्युरिटी की सेटींग करण्याची प्रोसेसदेखील जाहीर केली आहे.

सर्व सोशल नेटवर्कींग साईटसप्रमाणेच ट्विटरवरही सुरक्षित पासवर्ड हा कळीचा मुद्दा आहे. बहुतांश युजर्स हे अगदी नेहमीच्या वापरातले सुलभ पासवर्ड (उदा. १२३४५६) वापरतात. यामुळे त्यांचे खाते सुलभपणे हॅक करता येते. यामुळे पासवर्ड हा अत्यंत किचकट असावा. त्यातही त्याला वारंवार बदलण्यात यावे असा सल्ला नेहमी सायबर सुरक्षा तज्ज्ञांतर्फे देण्यात येतो. तसेच टु-स्टेप-ऑथेंटीकेशनही सुरक्षित मानले जाते. ट्विटरनेदेखील याला लागू केले आहे. या अंतर्गत नवे ब्राऊजर वा मशिनवरून लॉगीन करावयाचे झाल्यास संबंधीत युजरच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविण्यात आलेला कोड टाकावा लागतो. अथवा असा प्रयत्न होत असल्यास याची माहिती त्या युजरला मिळते.अर्थात या सर्व बाबी थोड्या किचकट आहेत. यातच कोडयुक्त एसएमएसही सहजपणे हॅक करता येतो. या पार्श्‍वभूमिवर अगदी खर्‍याखुर्‍या चावीने ट्विटरवर सुरक्षित लॉगीन करता आल्यास ते अतिशय सुरक्षित ठरू शकते. नेमका हाच विचार विचार लक्षात घेत ट्विटरने चावीच्या मदतीने लॉगीनची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. वर नमूद केल्यानुसार ही चावी खर्‍याखुर्‍या चाव्यांप्रमाणे नसून युएसबीच्या स्वरूपात असेल. काही महिन्यांपूर्वीच फेसबुकनेही याच प्रकारच्या लॉगीनची सुविधा प्रदान केली आहे हे विशेष.

युबिको कंपनीने गुगलसह अन्य कंपन्यांच्या सहकार्याने युएसबीच्या स्वरूपातील फिजीकल पासवर्ड की विकसित केल्या आहेत. याचा वापर केल्यास आपल्याला प्रत्यक्षात साईटवर (उदा. जीमेल, ड्रॉपबॉक्स आदी.) पासवर्ड टाकावा लागत नाही. या युएसबीच्या चीपमध्ये पासवर्ड अत्यंत सुरक्षितपणे टाकलेला असतो. संबंधीत युएसबी कोणत्याही संगणकाला लावल्यानंतर पासवर्ड सुरक्षित पध्दतीने व्हेरिफाय करत लॉगीन करता येते. यानंतर काम झाल्यावर संबंधीत युएसबी काढल्यानंतर संबंधीत उपकरणावर पासवर्डबाबत कोणताही पुरावा उरत नाही. यामुळे पासवर्ड चोरीचा प्रश्‍नही उदभवत नाही. संगणक, लॅपटॉप वा टॅबलेटसाठी या प्रकारातील युएसबी चावीचा वापर करता येणार आहे. या प्रकारातील युएसबी चावी वॉटरप्रुफ असून अतिशय दणकट असल्यामुळे याचा अगदी रफ वापरदेखील शक्य आहे. युबिको कंपनीने तयार केलेल्या युएसबी चाव्यांना विविध शॉपींग पोर्टल्सवरून उपलब्ध करण्यात आले आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here