यंत्र पत्रकारिता प्रणालीसाठी गुगलची मदत

0
प्रतिकात्मक छायाचित्र: आंतरजालावरून साभार.

गुगलने प्रेस असोसिएशन या ख्यातप्राप्त ब्रिटीश न्यूज एजन्सीला यंत्र पत्रकारिता प्रणालीस परिणामकारकतेने वापरण्यासाठी ८.०५ लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.

जगभरात प्रत्येक क्षेत्रात अ‍ॅटोमेशन वाढत असतांना पत्रकारिताही याला अपवाद असून शकत नाही. या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून रोबो जर्नालिस्ट अर्थात यंत्र पत्रकार अस्तित्वात आले आहेत. चीनमधील टेन्सेंट या कंपनीने आधीच या पध्दतीने वार्तांकन सुरू केले आहे. अलीकडच्या काळात तर जगातील अनेक मीडीया हाऊसेस या प्रणालीचा वापर करत आहेत. असोसिएटेड प्रेससह अनेक वृत्तसंस्था, वर्तमानपत्रे, वाहिन्या आणि न्यूज पोर्टल्स याचा अवलंब करत आहेत. विशेष करून आकडेवारींनी युक्त असणार्‍या बातम्यांसाठी ही प्रणाली अतिशय परिणामकारक आणि अचूक असल्याचे आधीच सिध्द झाले आहे.

या पार्श्‍वभूमिवर प्रेस असोसिएशन या ब्रिटीश न्यूज एजन्सीला गुगलने ८.०५ लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. गुगलच्या डिजीटल न्यूज इनिशिएटीव्ह या प्रकल्पाच्या अंतर्गत ही मदत प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गुगल कंपनी युरोपातील मीडिया हाऊसेसला अत्याधुनिक व अभिनव पध्दतीने वार्तांकन करण्यासाठी विविध प्रकारांनी मदत करत असते. याच पध्दतीने प्रेस असोसिएशनला मदत करण्यात आली आहे. यासाठी ही न्यूज एजन्सी अर्ब्ज मीडिया या स्टार्टपची मदत घेणार आहे. या दोन्ही संस्था मिळून अ‍ॅटोमेटेड पध्दतीने स्थानिक बातम्या तयार करणार आहेत. यासाठी रिपोर्टर्स अँड डाटा अँड रोबोट्स अर्थात रडार ही स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात येत आहे. अर्थात यातील सर्वच कामे हे यंत्रमानव करणार नाहीत, तर या प्रोजेक्टसाठी पाच पत्रकारांनी नियुक्त करण्यात येणार आहेत. ते स्वयंचलीत पध्दतीने तयार करण्यात आलेल्या बातम्या प्रकाशित करण्याआधी यावरून नजर फिरवण्याचे काम करतील. विशेष म्हणजे नव्या प्रणालीत अ‍ॅटोमॅटीक पध्दतीने प्रतिमा व व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधासुध्दा प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने महिन्याला तब्बल ३० हजार बातम्यांची निर्मिती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात स्थानिक वृत्तांना प्राधान्य देण्यात येणार असून नंतर मात्र विविध विषयांवर आधारीत वृत्त याच म्हणजेच स्वयंचलीत पध्दतीने तयार करण्यात येतील. पुढील वर्षी प्रेस असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेस १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमिवर संबंधीत संस्थेने वृत्तांकनासाठी आधुनिकतेची कास धरल्याचे दिसून येत आहे. गुगलने प्रेस असोसिएशनसोबत अल-जझीराचे एजे लॅब्ज अ‍ॅप, विकी ट्रिब्यून ही व्हर्च्युअल न्यूजरूम आणि डेनिस पब्लीशिंगच्या प्रोजेक्ट अरेटे या डिजीटल जाहिरात प्रणालीसाठीही मदत जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here