मोबीस्टारचे लवकरच भारतात आगमन

0

आपल्या किफायतशीरल स्मार्टफोनसाठी ख्यात असणार्‍या मोबीस्टार कंपनीने फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलशी सहकार्याचा करार करून भारतात आपले मॉडेल्स लाँच करण्याचे जाहीर केले आहे.

मोबीस्टार ही मूळची व्हिएतनाममधील कंपनी असून लवकरच भारतात पदार्पण करणार आहे. यासाठी फ्लिपकार्ट या अग्रगण्य शॉपींग पोर्टलशी सहकार्याचा करार करण्यात आला आहे. अर्थात या कंपनीचे मॉडेल्स फक्त याच शॉपींग पोर्टलवरून भारतीय ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या अनुषंगाने ही कंपनी २३ मार्च रोजी आपला पहिला स्मार्टफोन लाँच करणार आहे. या मॉडेलचे नाव आणि याच्या फिचर्सची माहिती देण्यात आली नसली तरी हा सेल्फी केंद्रीत स्मार्टफोन असेल असे फ्लिपकार्ट पोर्टलतर्फे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा असणार आहे. यात क्वॉलकॉमचा गतीमान प्रोसेसर तसेच उत्तम दर्जाची बॅटरीदेखील असेल. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन किफायतशीर दराचा असून याचे मूल्य ६ ते १० हजारांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या किंमतपट्टयात शाओमी, ओप्पो आदी चिनी कंपन्यांचा दबदबा असून यांना मोबीस्टार आव्हान देणार आहे.

दरम्यान, मोबीस्टार कंपनीने भारतातील व्ही-सन टेक्नॉलॉजी या कंपनीशी हँडसेट उत्पादनाचा करार केला आहे. यामुळे मोबीस्टारचे सर्व मॉडेल्स हे ‘मेड इन इंडिया’ या प्रकारातील असणार आहेत. फ्लिपकार्टच्या देशभरातील विक्रीच्या जाळ्याचा या कंपनीला लाभ होणार आहे. यासोबत मोबीस्टारने भारतात ८५० सर्व्हीस स्टेशन्स उभारले असून येत्या तीन महिन्यात ही संख्या एक हजारावर जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here