मुंबईचे फ्रॉगीपेडिया ठरले आयपॅड अ‍ॅप ऑफ द इयर !

0

मुंबई येथील कंपनीने विकसित केलेल्या फ्रॉगीपेडिया या अ‍ॅपला अ‍ॅपलने आयपॅड अ‍ॅप ऑफ द इयर या सन्मानाने गौरवान्वित केले आहे.

अ‍ॅपल कंपनीने २०१८ मधील नाविन्यपूर्ण व लक्षवेधी अ‍ॅप्सची माहिती जाहीर केली आहे. यात फ्रॉगीपेडियाला ‘आयपॅड अ‍ॅप ऑफ द इयर’ हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हे अ‍ॅप अ‍ॅपल एआर या तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आले असून याला फक्त आयपॅडवर वापरता येते. यामध्ये ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजेच विस्तारीत सत्यतेचा वापर करण्यात आला आहे. हे इंटरअ‍ॅक्टीव्ह या प्रकारातील अ‍ॅप्लीकेशन आहे. यात कुणीही बेडकाचे जीवनचक्र अगदी सुलभ पध्दतीत समजावून घेऊ शकतो. याच्या अंतर्गत युजरच्या आयपॅडवर व्हर्च्युअल बेडूक अवतरतो. यातून तो बेडकाबाबतची सांगोपांग माहिती मिळवू शकतो. मुंबई येथील डिझाईनमेट कंपनीने या अ‍ॅपला विकसित केले आहे. ही कंपनी ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रम अतिशय सोप्या पध्दतीत सादर करण्यासाठी ख्यात आहे. फ्रॉगीअ‍ॅपला अ‍ॅपलने सन्मानीत केल्यामुळे डिझाईनमेटला जगभरात प्रसिध्दी मिळाली आहे.

दरम्यान, अ‍ॅपलने २०१८ मधील गेमिंग, म्युझिक, पॉडकास्टींग, शैक्षणिक, आरोग्य, मनोरंजन आदी विविध क्षेत्रांमधील लक्षणीय अ‍ॅप्सची यादीदेखील जाहीर केली आहे. यामध्ये यावर्षी सेल्फ-केअर या प्रकारातील अ‍ॅप्सला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर गेमिंगमध्ये बॅटलग्राऊंड हा प्रकार ट्रेंडींमध्ये आल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here