मिवी कॉलर ब्ल्युटुथ नेकबँडची घोषणा

0

मिवी कंपनीने कॉलर या नावाने ब्ल्युटुथ नेकबँडच्या स्वरूपातील हेडसेट भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

मिवी कॉलर हे मॉडेल ग्राहकांना २,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आले असून ते ग्राहकांना अमेझॉन, फ्लिपकार्ट व पेटीएस या ऑनलाईन शॉपींग पोर्टलसह मिवीच्या शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे इयरफोन्स नेकबँड या प्रकारातील आहेत. अर्थात ते युजरला गळ्याच्या भोवती गुंडाळता येणार आहे. हे मॉडेल जितके स्टायलीश आहे तितकेच यात उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. यात हाय डेफिनेशन या प्रकारातील साऊंडचा सपोर्ट दिलेला आहे. म्हणजेच या माध्यमातून युजर्सला उत्तम प्रतिच्या ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. यामध्ये सीव्हीसी ६.० ही पॅसीव्ह नॉईज कॅन्सलेशन प्रणाली देण्यात आली आहे. याच्या मदतीने बाहेरील ध्वनीचा त्रास बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात आणता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

मिवी कॉलर ब्ल्युटुथ नेकबँड या मॉडेलमध्ये अतिशय दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर याला चार्ज करण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यात इनबिल्ट स्वरूपात मायक्रोफोन देण्यात आला असून याच्या मदतीने या हेडसेटशी संलग्न असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल करता येणार आहे. याच्या नियंत्रणासाठी तीन बटन्स देण्यात आले आहेत. यात कॉल रिसीव्ह करण्यासह म्युझिक ट्रॅक बदलणे आणि ध्वनी कमी-जास्त करण्याचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here