मिताशीच्या एयरकंडिशनरची एक्सट्रीम मालिका

0

मिताशी कंपनीने भारतीय बाजारपेठेत एक्सट्रीम ही एयरकंडिशनरची एक्सट्रीम ही नवीन मालिका सादर केली असून यात एकूण सात मॉडेल्सचा समावेश आहे.

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून यामुळे बहुतांश कंपन्या आपल्या वातानुकुलन उपकरणांचे नवनवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. यात आता मिताशी कंपनीने एक्सट्रीम ही नवीन मालिका सादर केली आहे. यात सात नवीन एयरकंडिशनर सादर करण्यात आले असून यात एक, दीड आणि दोन टनांच्या क्षमतांच्या मॉडेल्सचा समावेश आहे. या सर्व मॉडेल्सची खासियत म्हणजे अगदी ४८ अंश तापमान असतांनाही हे एयरकंडिशनर वातानुकुलन करण्यास सक्षम असल्याचा दावा मिताशी कंपनीने केला आहे. यात १०० टक्के तांब्याचे पाईप वापरण्यात आले आहेत. यामुळे जलद गतीने वातानुकुलन होत असून यासाठी तुलनेत कमी प्रमाणात वीज लागत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. आर्द्रता आणि ओलाव्यापासून वाचण्यासाठी यात विशेष प्रणाली देण्यात आली आहे. यात फोर-वे स्वींग प्रणाली असल्यामुळे वाढीव क्षेत्रफळात कुलींग होते. यामध्ये ऑटो-क्लिन प्रणालीदेखील असून याच्या मदतीने धुळीचे कण तसेच घातक जीवाणूंना प्रतिबंध करण्यात येतो. या सर्व मॉडेल्सला कंपनीने ५ वर्षांची वॉरंटी प्रदान केली आहे. तर उर्वरित फिचर्समध्ये एलईडीयुक्त डिस्प्ले पॅनल, रिमोट कंट्रोल, अँटी बॅक्टेरियल फिल्टर, ऑटो-रिस्टार्ट आदींचा समावेश आहे. मिताशी कंपनीच्या एक्सट्रीम मालिकेतील हे सर्व एयरकंडिशनर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here