माय जिओ अ‍ॅपने ओलांडला दहा कोटी डाऊनलोडचा टप्पा

0

रिलायन्स जिओ कंपनीच्या माय जिओ या अ‍ॅपने दहा कोटी डाऊनलोडचा महत्वाचा टप्पा पार केल्याचे आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

गुगल प्ले स्टोअरवर माय जिओ अ‍ॅपचे दहा कोटींपेक्षा जास्त डाऊनलोड झाल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. हॉटस्टार नंतर माय जिओ हे दहा कोटींचा टप्पा पार करणारे दुसरे अ‍ॅप ठरले ही बाब विशेष होय. एयरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या सेल्युरल सेवा पुरवणार्‍या कंपन्यांनीही या स्वरूपाचे अ‍ॅप्स सादर केले असले तरी याचे इतके डाऊनलोड झालेले नाहीत ही बाब लक्षणीय होय. अर्थात यातून रिलायन्सच्या जिओ सेवेचे वर्चस्वदेखील अधोरेखित झाले आहे. ग्राहकसंख्या, फोर-जी इंटरनेटचा वेग आणि आता अ‍ॅप डाऊनलोड या तिन्ही बाबींमध्ये रिलायन्स जिओ सेवेने अव्वल स्थान पटकावले असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here